Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातमी; ‘या’ अ‍ॅपच्या सहाय्याने करता येणार ऊस नोंदणी

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : ऊस उत्पादक (Sugarcane Prolific Farmers) शेतकऱ्यांना ऊस नोंदणी करायची झाल्यास वारंवार साखर कारखान्यांचे (Sugar Factory) हेलपाटे करावे लागत असे, यातून अनेकदा काहीही साध्य न होता शेतकऱ्यांना नोंदीणीसाठी प्रतिक्षेत रहावे लागत होते. नेमकी ऊस नोंदणी कधी होणार याबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला बघायला मिळत होते. आता शासनाने या समस्येतून मार्ग काढत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने दिलासा दिला आहे, याकरिता ‘महाऊस नोंदणी’ अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे.

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणार; गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी जाहीर

नुकत्याच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत, साखर आयुक्तालयाच्या कामकाजाविषयी आढावा घेतला. यावेळी मंत्र्याच्या उपस्थितीत ‘महाऊस नोंदणी’ अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. अनेकदा साखर कारखाने ऊस नोंदणी करण्यास टाळाटाळ करतात याचा सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांना होतो, त्यामुळे त्यांचे मनोधैर्याचे खच्चीकरण होत असते. त्यामुळे मंत्री महोदयांनी मध्यस्ती करत हा प्रश्न कायम मार्गी लावण्याचा निर्णय घेत या अ‍ॅपची सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख शेतकरी महाऊस नोंदणी अ‍ॅपसोबत जुळले आहेत. नोंदणीकृत ऊस तोडणीची आता सक्ती राहणार नसून, शेतकरी मर्जीने योग्य वेळी ऊस तोडणी व विक्री करू शकणार आहे. अशी माहिती साखर आयुक्त यांनी दिली.

काँग्रेसला मोठं खिंडार; जम्मू-काश्मीरमधील 64 नेत्यांचे राजीनामे

यावेळी शेतकऱ्यांना हमी देण्यात आली की, नोंदणीकृत उसाची खरेदी हमखास होणार आहे. सदर अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध असून, सुरुवातीला शेतकऱ्यांना आवश्यक ती प्राथमिक माहिती जसे ऊस क्षेत्र, शेतकऱ्याचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. इथे ऊस लागवडीची माहिती भरण्याचा पर्याय देखील उपलब्ध राहणार असून, सर्व बाबी योग्यरित्या भरून ऊस नोंदणी करता येणार आहे. ज्या कारखान्याकरिता शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी केली आहे ते स्वतःहुन शेतकऱ्यांना संपर्क करतील, अशा शासनातर्फे कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे महाऊस नोंदणी अ‍ॅप शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे, यामध्ये कुठलेही दुमत नाही.

सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात मात्र त्या दूर करण्याचा प्रयत्न तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री सावे यांनी दिले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.