Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी : भारतीय अर्थव्यवस्थेने घेतली भरारी; पहिल्या तिमाहीत जीडीपी दर १३.५ टक्क्यांवर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेची (Economy) गाडी रुळावर येण्याची वाट होती. देशांतर्गत वाढती महागाई, डॉलरच्या तुलनेत रुपयांचे अवमूल्यन(Depreciation), परकीय गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ तसेच शेअर बाजारातील (Share Market) पडझड यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुगीचे दिन कधी येणार? असे प्रश्न देखील निर्माण होत होते. देशातील महागाईचा दर व जीएसटी (GST) करामुळे वाढलेले वस्तूंचे भाव नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान सरकार समोर असताना, अर्थविश्वातून सध्या आनंदाची बातमी आली आहे. जीडीपी (GDP) म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनाच्या दरात आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत समाधानकारक वाढ झालेली आहे, यानुसार माहे एप्रिल ते जून २०२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी दर १३.५ टक्के इतका नोंदविल्या गेला आहे.

दिल्ली विधानसभा : ‘आप’ने जिंकला विश्वासदर्शक ठराव

देशातील प्रमुख आर्थिक संस्थांनी यंदा पहिल्या तिमाहीत जीडीपी दुहेरी आकडा गाठेल असा अंदाज बांधला होता. आरबीआयने आशा व्यक्त केली होती की जीडीपी या तिमाहीत १६.२ टक्के पर्यंत पोहचणार परंतु सध्या प्राप्त झालेली जीडीपी आकडेवारी तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक असून, अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याचे ते सूचक आहे. भारताचे शेजारी देश आर्थिक दिवाळखोरीत असताना सध्या देशाची अर्थव्यवस्था भरारी घेत असल्याचे चित्र आहे.

विनोद कांबळींनी स्वीकारली महाराष्ट्रातील युवा उद्योजकाची ‘ऑफर’; ‘या’ पदाची धुरा सांभाळणार

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे, याशिवाय यंदा मान्सूनचे(Monsoon) झालेले असमान वितरण, आरबीआयने वाढविलेले व्याजदर व चलनवाढ याचे प्रतिकूल परिणाम होत असताना सरकारने महागाई नियंत्रणात आणल्यास आणखी सकारात्मक दृश्य बघायला मिळू शकते. सध्या देशासमोर रुपयाला डॉलरच्या तुलनेत स्थिरता मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, परकीय गुंतवणुकीस व व्यापारास प्रोत्साहन दिल्यास परकीय गंगाजळीत (Foreign Currency Gaining) वाढ होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच अपेक्षित स्थैर्य मिळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.