Take a fresh look at your lifestyle.

वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी; पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनधारकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना पेट्रोल डिझेलचे दर अर्ध्यावर आणण्याचे आश्वासन दिले आहे.

वाहने 100% इथेनॉलवर चालतील

नितिन गडकरी म्हणाले, “या आठवड्यात, मी सर्व प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांच्या SIAM चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांनी मला आश्वासन दिले की ते एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करतील. गडकरी यांच्या मते, लवकरच भारतातील बहुतांश वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालतील. ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते, ज्यामुळे ते मिश्रित इंधन बनते. आणि ते सामान्य पेट्रोलच्या तुलनेत अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे.

कंपन्या फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करतील

येत्या सहा ते सात महिन्यात कंपन्या फ्लेक्स इंधन वाहनांचे उत्पादन सुरू करतील. त्यानंतर हा बदल होण्याची शक्यता आहे. ‘ईटी ग्लोबल बिझनेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना, गडकरी म्हणाले की, सरकार 100 टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांपासून सार्वजनिक वाहतूक चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.