Take a fresh look at your lifestyle.

Google Chrome वापरणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा इशारा; लगेच करा हे काम

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

वी दिल्ली – जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउजर्सपैकी एक असलेल्या गुगल क्रोमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भारतातही करोडो लोकांच्या कंप्युटर आणि मोबाइल फोनवर याचा वापर होतो. त्यामुळे गुगल क्रोम सतत हॅकर्सच्या निशाण्यावर असतं. आता सायबर सुरक्षा धोक्यांबाबत माहिती देणाऱ्या इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) Google Chrome बाबत एक अलर्ट जारी केला आहे.

इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) युजर्सला त्यांनी डेस्कटॉप ब्राउजर लवकरात लवकर अपडेट करण्याचं सांगितलं आहे. गुगलने क्रोम ब्राउजरमध्ये (Chrome) आलेल्या त्रुटींचा स्वीकार केला होता आणि त्यानुसार नवं अपडेट जारी केलं होतं. हेच पाहता इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने यासंबंधी नोट जारी करत युजर्सला अपडेटची माहिती दिली आहे.

CERT-In ने आपल्या नोटमध्ये सांगितलं, की गुगल क्रोमची अतिसंवेदनशीलता सायबर क्रिमिनल्सला आकर्षित करू शकते. हे हॅकर्स दूरवर बसून युजरच्या सिस्टममध्ये धोकादायक कोड एग्जिक्यूट करुन आणि सिक्योरिटी मोडण्याचं काम करतात. तसंच हे हॅकर्स युजर वापरत असलेलं सध्याचं सॉफ्टवेयरदेखील करप्ट करू शकतात.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिलेल्या माहितीनुसार, या धोक्यामागे असे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांचा गुगल क्रोमवर वापर केला जातो. सेफ ब्राउजिंग, रीडर्स मोड, वेब सर्च, थंबनेल टॅब स्ट्रिप, स्क्रिन कॅप्चर, पेमेंट्स, एक्स्टेन्शन्स, स्क्रोल इत्यादी प्लॅटफॉर्म्स आणि फीचर्सचा वापर Google Chrome च्या सुरक्षिततेला धोका वाढवतो.

कसं कराल अपडेट?

  • सर्वात आधी Chrome ब्राउजर ओपन करा.
  • त्यानंतर Help ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता About Google Chrome चा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करुन क्रोम ब्राउजर अपडेट होण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, कंपनीने गुगल क्रोमच्या लोगोमध्ये (Google Chrome Logo) बदल केले आहेत. काही दिवसांत हा बदललेला Logo पाहायला मिळेल. 2014 नंतर पहिल्यांदा क्रोम आपल्या लोगोमध्ये बदल करत आहे. गुगल क्रोमचे एक डिझायनर एल्विन हू यांनी ट्विटरवर रिडिझाइन लोगोचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.