Take a fresh look at your lifestyle.

गुगलचे ‘हे’ भन्नाट ॲप विशेष अलर्ट सुविधेसह सुसज्ज; पालकांची चिंता मिटणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात गुगलचा वापर सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मग ते गुगलचे सर्च इंजिन असो गुगल पे किंवा गुगल मॅप इत्यादी. गुगलने केलेली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती वाखाणण्याजोगी आहे. दरदिवशी वापरकर्त्यांना नवनवीन सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न गुगल करत असतो. आता गुगलने जगभरातील पालकांची चिंता मिटवण्याकरिता भन्नाट तोडगा काढला असून याअंतर्गत एका विशेष सेवावैशिष्ट्याचा समावेश गुगलच्या ‘फॅमिली लिंक’ ॲप मध्ये करण्यात आला आहे.

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शिंदे-फडणवीस सरकारकडे केली ‘ही’ मागणी

प्रत्येक वेळी ॲप निर्माते त्यांच्या नवनवीन आवृत्यांद्वारे वापरकर्त्यांना नवीन काही देण्याचा प्रयत्न करतात यावेळी आधीच्या काही सेवावैशिष्ट्यांमधील त्रुटी देखील दूर करण्यात येतात. गुगलने त्याच्या फॅमिली लिंक या ॲपच्या नव्या आवृत्तीमध्ये तीन महत्वपूर्ण सेवा वैशिष्ट्यांचा समावेश केला असून याद्वारे पालकांना त्यांच्या पाल्याची शाळा सुटल्यावर तंतोतंत स्थळाची माहिती मिळणार आहे. सदर ॲपच्या नव्या आवृत्तीमध्ये लोकेशन, कंट्रोल तसेच हायलाईट इत्यादी सेवा वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

ठाकरे-शिंदे गट समोरासमोर; ठाण्यानंतर नवी मुंबईत शाखा ताब्यात घेण्यावरून वाद

फॅमिली लिंक हे ॲप विविधांगी फायद्याचे असून नवीन केल्या गेलेल्या बदलानुसार पालकांना त्यांच्या पाल्याने कुठले नवीन ॲप त्यांच्या फोन मध्ये साठविले आहे याची अचूक माहिती मिळणार आहे, याशिवाय पाल्यांचे फोन किंवा टॅबलेट लॉक करण्याची सुविधा देखील हे ॲप देते. आता यापुढे मुलांच्या फोनवर कुठलीही नवीन सूचना आल्यास पालकांना त्याची माहिती प्राप्त होणार आहे. मुलांनी त्यांच्या फोन मध्ये आतापर्यंत कुठले ॲप वापरले याचे तपशील देखील तपासण्याची सुविधा फॅमिली लिंक ॲप देणार आहे.

धक्कादायक! पावसाच्या दृष्टचक्राने केला पुन्हा घात; ‘या’ जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

इथे सर्वात महत्वाची सेवा म्हणजे लोकेशन सेवा आहे, कारण मुलांची शाळा सुटल्यावर सर्वात अधिक पालकांना चिंतीत करणारी बाब म्हणजे ते नेमके सध्या कुठल्या स्थळावर आहे याची असते. यावेळी त्यांचे गंतव्यस्थळी पोहचण्याचा अंदाज तसेच हल्लीचे स्थळ याची अचूक माहिती फॅमिली लिंक ॲप देणार असल्याने, हे ॲप कमालीचे उपयोगी ठरणारे आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.