Take a fresh look at your lifestyle.

Education Loan: सर्वात कमी व्याजदर शैक्षणिक कर्ज देणाऱ्या सरकारी बँका, EMI किती भरावा लागेल?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – तुम्ही उच्च शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा 10 सरकारी बँकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या 20 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर सर्वात कमी व्याजदर (Education Loan Interest Loan) आहे. तसेच या बँकांमध्ये तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी 7 वर्षांचा कालावधी देखील मिळत आहे. bankbazaar.com ने या बँकांची यादी तयार केली आहे.

💰झटपट पर्सनल लोन हवं आहे का? मग या महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवाच

आयडीबीआय बँक (IDBI Bank)- तुम्हाला या बँकेकडून 6.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळत आहे. तुम्हाला 20 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 7 वर्षे मिळतील. म्हणजेच त्याची EMI 29,942 रुपये असेल.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) – या बँकेचा व्याजदर 6.85 टक्के आहे. 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी, तुम्हाला दरमहा 30,039 रुपये EMI भरावे लागेल.

वाह! आता फक्त ५,९९९ रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ HD LED TV; जाणून घ्या या बंपर सेलविषयी

इंडियन बँक (Indian Bank) – या बँकेचा व्याज दर 6.9 टक्के आहे तर तुम्हाला 30,088 रुपये EMI भरावा लागेल.

युनियन बँक (Union Bank) – या कर्जावरील व्याजदर 7 टक्के आहे. 7 वर्षांच्या कार्यकाळासाठी EMI 30,185 रुपये असेल.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) – तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून 7.15 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.

🚘केवळ 70 हजार डाउन पेमेंटवर बलेनो कार घरी आणा; महिन्याला भरा फक्त इतका EMI

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) – SBI चा व्याजदर 7.25 टक्के आहे. यासाठी तुम्हाला 30,340 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

बँक ऑफ इंडिया (Bank Of India) – SBI प्रमाणे, याचा देखील व्याज दर 7.25 टक्के आहे आणि तुम्हाला 30,340 रुपये EMI भरावा लागेल.

इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) – येथे देखील व्याज दर फक्त 7.25 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.

कॅनरा बँक (Canara Bank) – ही बँक या सर्वांपेक्षा 7.30 टक्के व्याजदराने कर्ज देते. जर तुम्ही येथून कर्ज घेतले तर तुम्हाला 30,480 रुपये EMI भरावे लागेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.