Take a fresh look at your lifestyle.

भाजपला थेट सत्ता स्थापनेचा दावा करता येणार का? सत्ता स्थापनेसाठी करावी लागेल ही प्रक्रिया

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shide) यांनी शिवसेनेच्या 33 आमदारांसह बंड पुकारलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आहे. मात्र एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात खळबळ

मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते दिसल्याने आता ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसह सत्तास्थापनेचा विचार केले तर ते सहज शक्य होणार नाही. सत्तास्थापनेची ही प्रक्रिया नेमकी कशी आहे हे समजून घेऊयात.

कशी असेल प्रक्रिया?

शिवसेनेतून फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही किंवा तसे करता येत नाही. यासाठी आधी विरोध पक्ष हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देतील. त्यानंतर फ्लोवर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचे भविष्य ठरेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, एकनाथ शिंदे ‘या’ 11 आमदारांसह गुजरातमध्ये

जर सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर विरोधकांना राज्यपालांकडे बहुत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.

मोठी बातमी! जन धन खातेधारकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला थेट खात्यात मिळणार ‘इतकी’ रक्कम

शिवसेनेच्या बंडखोर 33 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सूरत सोडून गुवाहाटीला दाखल झाले आहे.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला CISF ची सुरक्षा असणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.