Take a fresh look at your lifestyle.

गोविंदा आरक्षण : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील दहीहंडी उत्सवात (Dahihandi Festival) सहभागी होणाऱ्या गोविंदांना राज्य सरकारने नुकतेच खेळाडूचा दर्जा बहाल करत सरकारी नोकरीत आरक्षण (Government Job Reservation) देण्याचा निर्णय घेतल्याने विविध स्पर्धा परीक्षेची तयार करणारे विद्यार्थी चांगलेच संतापले आहे. यापुढे आता विटीदांडू, गोट्या खेळणाऱ्यांना देखील सरकारने आरक्षण द्यावे, अशा तीव्र शब्दांत विदयार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षे कठोर परिश्रम करत अभ्यास करणारे विद्यार्थी सरकारी नोकरीची आस लावून असतात, अनेकदा भरती प्रक्रिया रखडते तर काही विद्यार्थी गुणी असूनसुद्धा यादीमध्ये काही गुणांनी त्यांची सरकारी नोकरीची संधी गमविल्या जाते. अशा परिस्थितीत केवळ एक दिवस दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना नोकरीत आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय सर्वस्वी चुकीचा असल्याचे मत अनेक विदयार्थ्यांनी व्यक्त केले.

राज्यात वीज संकट निर्माण होण्याची शक्यता; सरकारकडून उपाययोजना सुरु

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होईलच शिवाय खेळाडू प्रमाणपत्रात (Sports Certificate) गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत राज्य सेवा परीक्षेचे समन्वय समितीचे राहूल कवठेकर यांनी व्यक्त केले आहे. काही विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रकरणावर महत्वपूर्ण प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केले की, केवळ एक दिवस खेळ करणारे खेळाडू कसे होऊ शकतात? एका शहराचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला आहे, परंतु याचे परिणाम दूरगामी होतील. सरकारने हा निर्णय रद्द करावा अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांनी दिला आहे.

वीज ग्राहकांवर दरवाढीची ‘टांगती तलवार’; महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार

एकंदरीतच सरकारने तडकाफडकीने घेतलेला निर्णय आंगलट येण्याची स्थिती निर्माण होताना दिसत आहे व आगामी काळात ‘अग्निविर’ योजनेसारखेच आणखी एका सरकारी निर्णयाला विरोध करत महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यास नवल उरणार नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.