Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी! शिंदे सरकारकडून राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळींनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. माविआ सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात सुरु असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना काही प्रमाणात पूर्णविराम लागला असं म्हणता येईल. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे वाद प्रामुख्याने समोर आला. महत्वाचं म्हणजे सत्तेत फेरबदल झाल्यापासून महाविकास आघाडीचे निर्णय बदलण्याचा धडाका नव्या सरकारने लावला आहे.

“गृहमंत्रीपद मिळाल्यास सत्तेत सहभागी होण्याचा विचार करू” – अमित ठाकरे

माविआने घेतलेले महत्वाचे निर्णय शिंदे सरकारकडून बदलण्यात येत आहेतच. याशिवाय अनेक ठिकाणचा निधीही रोखला जात आहे. याच धर्तीवर आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

नवे सरकार आल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दाखल झालेले गुन्हे केंद्रीय यंत्रणांकडे तपासासाठी दिले जात आहेत. याच पार्शवभूमीवर आता राज्यातील आणखी 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाकडून पोलिसांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रपती निवडीचा आनंद, आदिवासी महिलेची लाडूतुला

महत्वाचं म्हणजे यात गिरीश महाजन यांच्यासह इतर २८ जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे तसे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, महाजनांसह खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २९ आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआयला वर्ग करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजतंय.

विशेष म्हणजे, सीबीआयनं होकार दिल्यानंतर केस पेपर हस्तांतरण होणार आहे, अशी देखील माहिती आहे. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरण CBI कडे हस्तांतरित होणं हा रश्मी शुक्ला यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.