Take a fresh look at your lifestyle.

ग्रीन बायोकंपोस्‍ट प्रवरा तेजस प्‍लस खताचे उत्‍पादन सुरु

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लोणी : पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍यावतीने ऊस विकास योजना व सुपीक माती समृध्‍द शेती अभियानाच्‍या अंतर्गत ‘प्रवरा तेजस प्‍लस’ या ग्रीन बायोकंपोस्‍ट खताचे उत्‍पादन सुरु करण्‍यात आले आहे. ‘प्रवरा तेजस प्‍लस’ हे जैविक खत कृषी उत्‍पादनाच्‍या वाढीसाठी पोषकच ठरेल असा विश्‍वास आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

सर्व पिकांच्‍या उच्‍चतम उत्‍पादनासाठी एक परिपूर्ण जैविक सेंद्रीय खत म्‍हणून याचे उत्‍पादन डॉ.विखे पाटील कारखान्‍याच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. रासायनीक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्‍याने जमीनीचा पोत धोक्‍यात आला आहे. पिकांवरही त्‍याचा परिणाम होवू लागल्‍याने उत्‍पादनही घटले आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्‍यासाठी या सेंद्रीय खताचा चांगला लाभ शेतक-यांना होवू शकतो असा विश्‍वास आ. विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

या खताच्‍या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारण्‍यास तसेच प्रामुख्‍याने ऊस उत्‍पादकांना हुमनी अळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यात मोठी मदत होईल. या खतामध्‍ये सेंद्रीय घटक मोठ्या प्रमाणात वापरण्‍यात आल्‍याने पिकांची निरोगी व जोमदार वाढ होवून रोगप्रतिकारक शक्‍तीही वाढेल. बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आलेले हे खत ऊस, द्राक्ष, डाळींब तसेच इतर फळबागा व भाजीपाला उत्‍पादक शेतकरी वापरु शकतील. माफक दरात प्रवरा फळे भाजीपाला सहकारी संस्‍थेच्‍यावतीने या खतांची विक्री सुरु करण्‍यात आली असून, गुढीपाडव्‍याच्‍या मुहूर्तावर अनेक शेतक-यांनी या खताची खरेदी केली.

याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, व्‍हाईस चेअरमन विश्‍वासराव कडून, ट्रक्‍स वाहतुक संस्‍थेचे चेअरमन नंदू राठी, प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्‍या चेअरमन गिता थेटे, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे यांच्‍यासह पदाधिकारी, ग्रामस्‍थ याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.