Take a fresh look at your lifestyle.

पुलवामा भागात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यातील गदुरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade attack) केलाय. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी होता.

नामांतर आंदोलनातील शहिदांना भाजपातर्फे अभिवादन

या घटनेची माहिती येथील पोलीस ठाण्याने दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल (Mohammad Arif and Mohammad Majbool) अशी या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे मजूरही बिहार राज्यातील रामपूरचे रहिवासी आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

यवतमाळ जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करा!

दरम्यान, या घटनेनंतर या भागात नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मूळचे जम्मू-काश्मीरचे नसून तेथे व्यवसायानिमित्त गेलेल्या नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून या घटना थांबल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ल्याद्वारे बिहार राज्यातील नागरिकांना लक्ष्य केल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. (Now once again the system has been alerted as the terrorists targeted the citizens of Bihar state through grenade attack.)

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.