Take a fresh look at your lifestyle.

केवळ ‘इतक्या’ किंमतीत नवीन Electric Scooter लाँच, जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Electric Scooter भारतात दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी किमान दोन-तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होत आहेत. आज सकाळी कोमाकी या टू व्हीलर निर्मात्या कंपनीने त्यांच्या दोन ई-स्कूटर लाँच केल्या. आता अजून एक किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे.

बेरोजगारांसाठी मोठी बातमी । राज्य सरकार देणार तब्बल 66 हजार जणांना नोकऱ्या

दरम्यान, ग्रेटा इलेक्ट्रिक (Greta Electric) कंपनीने आज त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ग्रेटा हार्पर झेडएक्स सिरीज १ (Greta Harper ZX Series-I) भारतात ४१ हजार ९९९ रुपये इतक्या किंमती लाँच केली आहे. स्कूटरमध्ये बॅटरी आणि चार्जरचे अनेक पर्याय दिले आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या सहा रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे.

बापरे! पगारात रोख रक्कम नाही तर चक्क ‘सोनं’ देते ही कंपनी; जाणून घ्या यामागील महत्वाचं कारण

ग्रेटा हार्पर झेडएक्स सिरीज १ ही स्कूटर इको, सिटी आणि टर्बो अशा तीन रायडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे. स्कूटर पूर्ण चार्ज केलेली असेल आणि तुम्ही ती इको मोडवर चालवलीत तर तुम्हाला १०० किमीपर्यंतची रेंज मिळेल. तर सिटी आणि टर्बो मोडवर ही स्कूटर अनुक्रमे ८० किमी आणि ९० किमीपर्यंतची रेंज देईल.

“नॉक आऊट’ राऊंडपूर्वी मुंबईला धक्का, IPL गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

महत्त्वाचे फीचर्स

या स्कूटरमध्ये डीआरएल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, फाइंड माय व्हेईकल अलार्म, एक यूएसबी पोर्ट (यूएसबी 2.0) यांसारखे महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्कूटरवर कंपनीने ३ वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे.

मोठी बातमी! मोदी सरकार जगाला देणार आणखी एक झटका; लवकरच मोठा निर्णय होणार?

२ हजार रुपयांमध्ये करा बुकिंग

४१,९९९ रुपये इतक्या किंमतीत लाँच केलेली ही स्कूटर तुम्ही २००० रुपये इतकी टोकन अमाऊंट भरून बुक करू शकता. स्कूटर बुक केल्यानंतर ४५ ते ७५ दिवसांमध्ये तुम्हाला स्कूटरची डिलीव्हरी मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. तुम्ही जर स्वस्तातली इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर ग्रेटा कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.