Take a fresh look at your lifestyle.

अजबच! लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवाची नवरीला बेदम मारहाण, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – भारतीय लग्नपद्धत जगात सर्वात सुंदर लग्नपद्धत म्हनुन प्रसिद्ध आहे. शिवाय लग्नासारखं शुभकार्य म्हटलं की सर्वजण आवर्जून उपस्थिती लावतात. भारतीय लग्नातल्या चेष्टा, मस्करी, वेगवेगळ्या परंपरा यांची तर बातच न्यारी. सोशल मीडियावर अशा नवरी-नवरदेवाचे व्हिडिओव्हायरल होत असतात. प्रत्येकच लग्नात असं काहीतरी नक्की होतं, ज्यामुळे तो दिवसच आयुष्यभर लक्षात राहातो. किंवा एखाद्या घटनेमुळे लग्नाचा तो दिवस अविस्मरणीय होऊन जातो. काही गोष्टी आपल्या आठवणींमध्ये कायम राहतात आणि त्या आठवून नेहमीच हसायला येतं. सध्या सोशल मीडियावर सध्या एक असाच अजब वेडिंग व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

प्रत्येक नवरा नवरीची इच्छा असते की आपलं लग्न सर्वात खास, स्मरणात राहील असं आणि इतरांपेक्षा वेगळं असावं. यासाठी अनेकदा लोक असं काही करतात, जे पाहून सगळेच थक्क होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओदेखील असाच अजब आहे, ज्यात नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला मारायला सुरुवात केली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेव आपल्या नवरीला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र नवरी मिठाई खाण्यासाठी पुढे येत नाही आणि मिठाई खात नाही. यानंतर नवरदेव मस्करीतच ही मिठाई तिच्या तोंडावर फेकतो आणि मग याचा बदला घेण्यासाठी नवरीदेखील एक मिठाई उचलून नवरदेवाच्या तोंडावर फेकते. नवरीच्या या कृत्यानंतर नवरदेव चांगलाच भडकतो. तो स्टेजवरच सर्वांसमोर नवरीला २-३ चापटी मारतो. यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडतो.

हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला गेला असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 13 लाखहून अधिकांनी पाहिला आहे तर 13 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत आणि यावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, नवरदेवाने हे अतिशय चुकीचं केलं. दुसऱ्या एकाने लिहिलं, मला वाटतंय हे लग्न जबरदस्ती लावलं जात आहे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत

 

Leave A Reply

Your email address will not be published.