Take a fresh look at your lifestyle.

नेवासेत “गजर गुढीचा सन्मान नेवासकरांचा” कार्यक्रम

0
maher

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासा : नेवासा येथील श्री काशीविश्वेश्वर प्रतिष्ठानने मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला “गजर गुढीचा सन्मान नेवासकरांचा “या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली

कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन रामकृष्ण परमहंस आश्रमाचे स्वामी ज्ञानेश्वर महाराज व नेवासा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा योगिता सतिष पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काशिविश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ.शंकरराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

पाचेगाव येथील अशोकराव नांदे पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यान दिले.
त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी नेवासा येथील रामकृष्ण परमहंस आश्रमाचे स्वामी ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत राज्यात तृतीय क्रमांक मिळवून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील गळनिंब येथील गिता काकासाहेब मुळे, निराधार व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या आधार सेवा संकल्प प्रतिष्ठान वडाळा बहिरोबा या संस्थेचे अध्यक्ष जयंत लक्ष्मण मोटे, कोरोना काळात चांगले काम केलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गिते, जुन्या काळात विविध कार्यक्रमात बॅड वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे नेवासा बुद्रुक येथील जयवंत नाथा चांदणे, पसायदान संस्थेची स्थापना करून ग्रंथालय, अभ्यासिका, वृक्ष लागवड व संवर्धन करणारे पाचेगाव येथील विजय बाबु तुवर, कोरोना काळात शहराकडुन गावी पायी चाललेल्या मजुरांना अन्न वस्त्र देण्यासाठी ३ लाख रुपये व किराणा साहित्य जमा करून रोज एक हजार जणांना दोन महिने अन्नछत्र चालविणाऱ्या नेवासा येथील विवेक भावना गृपचे सदस्य या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरव करण्यात आला.

शिवकृष्ण स्पोर्ट्स & फिटनेस अकॅडमी बॉल जगलिंग, प्रदीप राजगिरे, महेश मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. शिवकालीन मर्दानी खेळ ॲकॅडमी मास्टर सुरेश लव्हाटे यांच्यावतीने शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. बासरी वादक रोहित गवळी व आशिष गवळी यांनी बासरी वादन केले .

यावेळी गायक अजय कुलकर्णी, सुधीर चव्हाण, अभय मोहिते, माधुरी कुलकर्णी, राजू शेख, शंकर गव्हाणे, राजेश कडू, आदेश टेकाळे, डॉ.शंकर शिंदे, प्रा.सुनील गर्जे, वैशाली ओहोळ, विद्या देवढे, भारती नळघे, राजेंद्र परदेशी, प्रा देविदास साळुंके, राजेंद्र पिंपळे, विशाल पवार, शुभम सोनवणे यांनी मराठी हिंदी गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री काशीविश्वेश्वर प्रतिष्ठानचे सतीश पिंपळे, नितीन कुलकर्णी, विजय कोकणे, मनोज पारखे, संतोष भांबरे, संतोष कुंढारे, रंजन जाधव, प्रशांत कानडे, पवन गरुड, अनिल शिंदे, अभिषेक गाडेकर, डाॅ करण घुले, आशिष कावरे, सुहास पठाडे, योगेश रासने, रुपेश उपाध्ये, राजेंद्र अडसुरे, कैलास चव्हाण, सौरभ मुनोत, रमेश शिंदे, अमित मापारी, विवेक नळकांडे, संदिप वीर, संतोष भागवत, पवन देशमुख, दीपक परदेशी यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचलन औरंगाबाद येथील मेलडी क्विन ऑर्केस्ट्राच्या कल्पना ढोकणे यांनी केले तर आभार सतिष पिंपळे यानी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.