Take a fresh look at your lifestyle.

गुजरात निवडणूक: भाजपची नवी खेळी; तीन देशातील अल्पसंख्याकांना राज्याचे नागरिकत्व मिळणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सध्या गुजरात निवडणुकीवर देशातील सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले असून सत्ताधारी भाजपला कुठल्याही स्थितीत सत्ता कायम ठेवायची आहे. तर दुसरीकडे यापूर्वी गुजरात निवडणुकीत पराभवाचा सामना केलेला आप पक्ष यंदा आपले नशीब आजमावण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. आप यंदा मागील निवडणुकीपेक्षा वेगळी कामगिरी करण्याचे मनसुबे आखत असताना भाजप देखील आप ला शह देण्यात कुठलीच कसर सोडत नाही आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारने गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशातील अल्पसंख्यांक नागरिकांना राज्याचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी तसेच ख्रिश्चन धर्मियांचा समावेश राहणार आहे.

नोकरभरती संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वपूर्ण निर्णय होणार; ‘हे’ प्रमुख मुद्दे आले पुढे

नव्याने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार गुजरातच्या आनंद आणि मेहसाणा जिल्ह्यातील बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून विस्थापित सर्व हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी तसेच ख्रिश्चन धर्मियांना राज्याचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. सदर नागरिकत्व सीएए या वादग्रस्त नागरिकत्व कायद्यानुसार देण्यात येणार नसून नागरिकत्व कायदा वर्ष १९५५ अनुसार देण्यात येणार आहे. यामध्ये कलम ६ अंतर्गत या सर्व नागरिकांना या जिल्ह्यांमध्ये राहण्याची परवानगी राहणार असून नागरिकत्व कायदा १९५५ तसेच २००९ नुसार संबंधित प्रशासनाकडे नागरिकत्व नोंदणी करणे तसेच नागरिकत्व बहाल करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

आजपासून पाच मोठे बदल; थेट तुमच्या आयुष्यावर होणार परिणाम

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर जर याला भाजपची खेळी म्हटल्या जात असले तरी सीएए नागरिकत्व सुधारणा कायदा प्रत्यक्षात लागू न झाल्याने इतर देशातील अल्पसंख्यांकांचे देशात पुनवर्सन करायचे झाल्यास नेमका कुठला मार्ग निवडावा हा प्रश्न होता, त्यालाच निदान देत हा निर्णय घेतल्या गेल्याचे समजते. भाजपच्या या निर्णयाचा परिणाम नक्कीच येत्या काळातील निवडणुकीच्या निकालांवर पडणार असून यामुळे आपला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारल्या जाऊ शकते हे यावरून स्पष्ट होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.