Take a fresh look at your lifestyle.

गुजरातमध्ये पावसाचं रौद्ररूप! अहमदाबाद पाण्याखाली, ६१ लोकांचा मृत्यू; ३८८ रस्ते बंद

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदाबाद : सध्या संपूर्ण भारतातील अनेक राज्यांत पावसाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रासह दक्षिण गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. महत्वाचं म्हणजे मागच्या तीन दिवसांपासून अहमदाबाद आणि इतर परिसरातील पाऊस बंदच नाहीय. यामुळे राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. गुजरातची सध्याची परिस्थिती पाहता अहमदाबादमधील शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; उद्धव ठाकरे भाजपच्या वाटेवर?

धक्कादायक बाब म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात पूर-पावसाच्या घटनांमध्ये आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. काही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबादमधील नवसारी, वलसाड, डोंग आणि छोटा उदयपूरसह अनेक जिल्ह्यांतील दोन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने ९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुराचे भीषण फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

बंडाच्या निर्णयाला आधार नाही? शरद पवारांकडून बंडखोरांना आव्हान

औरंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.वलसाडमधील काही सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचावकार्य करत आहे. कावेरी आणि अंबिका नद्या धोक्याच्या पातळीवर असून नवसारी जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदाबाद शहरात रविवारी संध्याकाळी ७ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन तास मुसळधार पाऊस झाला. तीन तासांच्या पावसात शहरातील मोठा परिसर जलमय झाला. एनडीआरएफच्या १३ तुकड्या आणि एसडीआरएफच्या १६ तुकड्या या भागात तैनात आहेत. दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ३८८ रस्ते बंद करण्यात आले आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.