Take a fresh look at your lifestyle.

एसटी कर्मचाऱ्यांचे सुगीचे दिन येणार; महागाई भत्त्यात ३४ टक्क्यांपर्यंत वाढ

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात याअगोदरच वाढ करण्यात आली होती. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के इतका महागाई भत्ता देण्यात येत आहे. मागील वर्षी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २८ टक्के इतका महागाई भत्ता देण्यात आला होता. नेमक्या याच पद्धतीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी २८ टक्के इतका महागाई भत्ता सरकारकडून देण्यात आला होता, आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ३४ टक्के महागाई भत्त्याच्या धर्तीवर नेमका तेवढाच महागाई भत्ता एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के इतकी वाढ केली जाणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे; भारत जोडो यात्रा थांबवण्याची मागणी

राज्य सरकारने नुकतीच मंजुरी देत एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने याचा थेट फायदा महामंडळाच्या एकूण ८९ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. परिणामी एसटी महामंडळावर १८ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा वाढणार आहे. राज्य सरकारला महागाई भत्ता वाढीकरिता तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला असता सदर प्रकरणी नुकताच राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात महागाईचा दर इतर राज्यांपेक्षा अधिक; शहरी भागात महागाईची आकडेवारी चिंतादायक

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे. महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून, यामुळे त्यांचे सुगीचे दिन येणार असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.