Take a fresh look at your lifestyle.

‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट; काही भागात मुसळधार पावसाचा अलर्ट

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर, वायव्य आणि मध्य भारतात तापमानानं उच्चांक गाठला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षाही अधिक काळापासून देशभरात उष्णतेची लाट आहे. इथं दररोजचं कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचलं आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

आर्थिक लाभासह ‘या’ कारणामुळे ५ राशींचं नशीब आज फळफळणार! तुमचीही रास यात आहे का?

पुढील 5 दिवसांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यान अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालयात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 ते 17 एप्रिलदरम्यान आणि 17 एप्रिलला नागालँड-मणिपूर-मिझोराम-त्रिपुरा येथे मुसळधार पाऊस पडेल. पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय आणि नागालँड-मणिपूर-मिझोराम-त्रिपुरा येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत केरळ-माहे, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये गडगडाट/विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पडेल.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवीन ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ९०% अनुदान योजना सुरु; असा करा अर्ज

हवामान खात्याने 17 एप्रिल, दक्षिण कर्नाटकात अंतर्गत प्रदेशात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. तामिळनाडूच्या घाट भागात 15 एप्रिल ते 17 एप्रिलदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 16 ते 17 एप्रिलदरम्यान केरळ, 15 ते 18 एप्रिल दरम्यान दक्षिण कर्नाटकाच्या अंतर्गत भागांत आणि 15 एप्रिलला उत्तर कर्नाटकात अंतर्गत भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र (विशेषतः उत्तर महाराष्ट्र, विदर्भ), उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू, राजस्थान, येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मात्र, देशातल्या दक्षिण आणि ईशान्य भागात पावसाची शक्यता आहे. येथील तापमान 40 ते 42 अंशांवर राहील. काही ठिकाणी ते 2 ते 3 अंशांनी वाढण्याचीही शक्यता आहे.

संजय दत्तचा मृत्यू आणि त्याचा निर्मात्यांना होणारा मोठा फायदा; हे गणित माहिती आहे का?

Leave A Reply

Your email address will not be published.