Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात पावसाचे रौद्ररूप; ‘या’ पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झालं. यावर्षी जून महिन्यात पावसाने अक्षरशः दांडी मारली. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दमदार आगमन केलं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत असला तरी काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक नद्यांना अतिमुसळधार पावसामुळे पूर आला असून गावं, वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही पावसाची संततधार सुरुच आहे.

आज भारतात Hyundai Tucson होणार लाँच; ‘ही’ कार देणार टक्कर

दरम्यान, हवामान विभागाने पाच जिल्ह्यांमध्ये रेडअलर्टचा इशारा दिला असून यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. शिवाय, पुढील पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बऱ्याचशा गावातला जनसंपर्क तुटला असून अतिप्रमाणात झालेल्या पावसाने नद्या इशारा पातळीच्या बाहेर गेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून नद्यांजवळील गावांना स्थलांतराचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी 31 फुटांवर पंचगंगा नदीची पातळी होती झालेल्या पावसाने तब्बल 4 फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे लवकरच पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.