Take a fresh look at your lifestyle.

नवरात्रीतही दमदार पाऊस कोसळणार; परतीचा मान्सून सक्रिय हवामान विभागाचा अंदाज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदा नवरात्रीतही दमदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ‘येरे येरे पावसा’ म्हणणाऱ्या विदर्भवासीयांवर आता ‘जारे जारे पावसा’ म्हणायची वेळ आली आहे.

सप्टेंबर महिना संपत आला असला तरी अद्यापही काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. राजस्थानमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असला, तरी त्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विदर्भही पावसापासून वाचला नसल्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात नुकत्याच तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या आठवड्यात वादळी पावसाचे वर्चस्व होते.

शेअर बाजाराला मोठा फटका; मार्केट उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी आपटला

शिवाय, 25 सप्टेंबरनंतर जोर कमी होऊन ऑक्टोबरच्या मध्यात परतीचा मान्सून विदर्भात सक्रिय राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पाऊस सुरू राहणार आहे. विदर्भात 27 आणि 28 सप्टेंबरला पिवळा अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय, 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.