Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी! नागरिकांना दिलासा; मात्र, शेतीवर होणार परिणाम

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

इचलकरंजी – यंदा शेतकऱ्यांना हवामानातील अनेक बदलांना अचानकपणे सामोरे जावे लागत आहे. देशभरात यंदा 122 वर्षानंतर म्हणजे एका शतकानंतर सर्वाधिक उष्णतेचा महिना मार्च महिन्याची नोंद करण्यात आली. यावेळी एप्रिल महिन्यात देखील उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. सध्या बऱ्याच शहरांत तापमान 42-43 अंशावर पोहचले असून एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यातील तीव्र उन्हाळ्यानंतर आता एप्रिलही अंगाची लाहीलाही करणार असा अंदाज व्यक्त आहे.

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट; पुढचे दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

तीव्र उन्हाचा तडाखा असतानाच राज्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागात देखील वादळी पावसाची हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी (Kolhapur) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड या तालुक्यांमध्ये पावसाने (Rain) अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारापेठेत पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे हाल झाले.

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची अचानक झालेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसात झालेल्या पावसाने नागरिक काही प्रमाणात सुखावले.

ईडीची सर्वात मोठी कारवाई! अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया वाचाच

काजू उत्पादनावर परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यात सध्या काजूचा हंगाम आहे. सध्या दाट धुकं पडल्यामुळे काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अजून जास्त प्रमाणात काजू लागली नसल्यामुळे या पावसाचा काजूवर काही परिणाम होतो का याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

सांगली शहर व परिसरात पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत

सांगली शहर व परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. आज सकाळपासूनच सांगली शहरासह ग्रामीण परिसरात उष्णता जाणवत होती. त्यानंतर दुपार ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारच्या सुमारास वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उकड्यामुळे हैराण झालेल्या संगलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

आता केवळ ‘इतक्या’ तासात करता येईल नागपूर ते मुंबईचा प्रवास! १ मेपासून ‘हा’ महामार्ग सुरू

उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

सध्या सांगली जिल्ह्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागातही उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. उष्णतेमुळे कंटाळलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या द्राक्ष बागेतील कामंही आटपत आली असून ऊस तोडही संपत आली आहे. त्यामुळे या पावसाचा शेतीवर गंभीर परिणाम होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवीन ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी ९०% अनुदान योजना सुरु; असा करा अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.