Take a fresh look at your lifestyle.

पुढचे ५ दिवस अतिमुसळधार पावसाचे! कोकणसह ‘या’ भागांना इशारा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मागच्या २ दिवसांपासून कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतच आहे. अशातच पावसासंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे. महत्वाचं म्हणजे, पुढील ५ दिवस हा पाऊस ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात देखील चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून विदर्भातील अकराही जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे.

ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार; शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी

वसईच्या मीठागर परिसरात मुसळधार पावसामुळं पाणी साचलं असून येथील रहिवासी घरांमध्ये अडकले आहेत. या परिसरात सध्या तीन ते चार फूट पाणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तीनशे ते चारशे नागरिक या परिसरात अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य केले जात आहे.

मागील २४ तासात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे रायगडमधील कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुराचा संभाव्य धोका सध्या नसला तरी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं?

दुसरीकडे, कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप सुरूच असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे होत आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी 32 फूट 6 इंचावर पोहचली आहे. 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असून त्यामुळे 60 पेक्षा जास्त गावांचा थेट संपर्क तुटला आहे. या भागात पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आयएमडीने पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.