Take a fresh look at your lifestyle.

दडी मारून बसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात राज्यात सक्रिय होणार; हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते, जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात सक्रिय झालेल्या मान्सूनच्या पावसाने संपूर्ण कसर भरून काढत ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण केली होती. अनेक जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस पडला व यामुळे शेतातील उभे पिके खरडल्या गेली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्याने स्थिती सामान्य आहे, परंतु सप्टेंबर महिन्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार, असा अंदाज हवामान खात्याने नुकताच व्यक्त केला आहे.

किटकनाशक मृत्यू प्रकरण : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘स्वित्झर्लंड’ न्यायालयात पोळ्याच्या दिवशी मोठा विजय

प्राप्त माहितीनुसार राज्यात १ सप्टेंबरपासून पाऊस वेगाने सक्रिय होऊ शकतो, त्यामुळे महिन्याअखेरीस एक ते दोन दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागात मध्यम व सौम्य स्वरूपाचा पाऊस हजेरी लावू शकतो. गणेशाचे आगमन व पावसाचा जोर वाढणे असा मुहूर्त साधल्या जाऊन कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमुक्त प्रवास करता येणार; राज्य सरकारचा निर्णय

अगोदरच अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी वर्ग आता कुठे थोडाफार स्थिरावला असल्याने येत्या काळात जर अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली तर ही शेतकऱ्यांना न परवडणारी बाब ठरेल. त्यामुळे अगोदर पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, कुठे तरी आता पावसाची बातमी धडकी भरवणारी ठरणार, हे नक्की!

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.