Take a fresh look at your lifestyle.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजेरी लावणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले होते, त्यामुळे संपूर्ण जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या गेल्या होत्या. गेल्या अनेक दशकांपासून ब्रिटनच्या शासनात एलिझाबेथ द्वितीय यांची भूमिका महत्वपूर्ण अशी होती, संपूर्ण कारकिर्दीत तब्बल १५ ब्रिटिश पंतप्रधानाची नेमणूक राणी एलिझाबेथ यांनी केली होती, विस्टन चर्चिल ते लिझ ट्रस असा हा प्रवास होता. १९ सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील या अंत्यसंस्कार कार्यप्रसंगी हजेरी लावणार आहे.

राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपचा दणका; गोव्यात काँग्रेसला खिंडार

एलिझाबेथ द्वितीय यांच्या अत्यंसंस्कार कार्यप्रसंगी जगातील अनेक देशांतील नेते उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिव देहावर विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफनविधी क्रिया करण्यात येणार आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर राहणार आहेत यावेळी त्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंतिम दर्शन घेतील व अंत्यसंस्कार विधीला हजर राहतील.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.