Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेट जगतात खळबळ! सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यावर गंभीर आरोप

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – क्रिकेट जगतातून आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज (Herschelle Gibbs) याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourabha Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर लीगमध्ये सहभागी झाल्यास भविष्यात भारतीय क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम करता येणार नाही अशी धमकी सौरभ गांगुली आणि जय शहा यांनी दिल्याचा आरोपही गिब्जने केला आहे.

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये (KPL) आपण सहभागी होऊ नये यासाठी सौरभ गांगुली आणि जय शहा या दोघांनी आपल्यावर दबाव टाकला. असा खळबळजनक दावा हर्षेल गिब्ज यांनी केल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ग्रॅहम स्मिथ हा सध्या दक्षिण आफ्रिका क्रिक्रेट बोर्डाचा (South Afrcia Cricket Board) संचालक आहे. त्यांच्यातर्फे जय शहा यांनी हा संदेश पाठवला होता. यात काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाल्यास भारतात काम करु दिलं जाणार नाही, असं म्हटलं होतं. यानंतर आपण सौरभ गांगुली यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही या गोष्टीला राजकीय रंग देत आहात, मी राजकारणी नाही, ही गोष्ट अन्यायकारक असल्याचं आपण सौरभ गांगुलीला सांगितलं, त्यांनी ही गोष्ट मान्य केल्याचा दावाही गिब्ज याने यावेळी केलाय.

हर्षेल गिब्जने इंस्टाग्रामवर काश्मीर प्रीमियर लीग सीझन 2 सुर होणार असल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत हर्षेल गिब्ज याने कॅप्शनमअये लिहिलंय, दुबईमध्ये KPL T20 चा सीझन 2 लाँच झाला, पुन्हा एकदा त्याचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे.

याअगोदर देखील पाकिस्तानात होणारी काश्मीर प्रीमियर लिग सुरु होण्याआधीच वादात सापडली होती. या टी20 स्पर्धेला मान्यता न मिळण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीला पत्र देखील लिहिलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.