Take a fresh look at your lifestyle.

दादा पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी

0

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत : भविष्यातील धोके टाळण्यासाठी पर्यावरण संरक्षणाची आज गरज असून यासाठी शाळा व महाविद्यालयातून पर्यावरण संरक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. या हेतूने होळीचा सण साजरा करताना होळीमध्ये लाकडांचा वापर न करता पालापाचोळा वापरावा. तसेच रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर न करता मुलतानी माती व जास्वंदाची फुले यापासून बनविलेले नैसर्गिक रंग वापरावेत. या वापरासंदर्भात इतरांनाही माहिती सांगावी असे आवाहन कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत यांनी केले.

येथील दादा पाटील महाविद्यालय आणि नगरपंचायत कर्जत यांच्या सयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान -२ ‘ या उपक्रमांतर्गत दादा पाटील महाविद्यालयात पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा राऊत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते. शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड यावेळी उपस्थित होत्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे आज आपण सर्वांनी सावध होण्याची गरज आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेऊन, स्वतः पासून सुरुवात करून आपले कुटुंब, मित्र, नातेवाईक या सर्वांना पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्यासंदर्भात विनंती करावी असे आवाहन केले.

पर्यावरण पूरक रंगपंचमी कशी साजरी करावी ? हा संदेश देण्यासाठी दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात एका भिंतीवर नैसर्गिक रंग वापरून सर्वांनी हाताचे ठसे उमटविले व पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केल्याचा आनंद लुटला. यावेळी नगरसेविका ज्योतीताई शेळके यांनी रासायनिक रंगांमुळे आरोग्यास धोका असल्याचे सांगून, रंगपंचमीच्यावेळी नैसर्गिक रंग वापरावेत असे सर्वांना आवाहन केले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा उषाताई राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणीताई घुले, नगरसेविका.लंकाताई खरात,.मोनालीताई तोटे, ताराबाई कुलथे, अश्विनीताई दळवी, प्रतिभाताई भैलुमे, छायाताई शेलार, मोहिनीताई पिसाळ, सुवर्णाताई सुपेकर, याशिवाय श्सचिन घुले, गट नेते, संतोष मेहत्रे, भाऊसाहेब तोरडमल, रज्जाक झारेकरी, अमृतराव काळदाते, .भास्कर भैलुमे, उप गटनेते सतीष पाटील, अभय बोरा या नगरसेवक व अनेक मान्यवरांसह प्राचार्य डॉ.नगरकर, नगरपंचायत मुख्याधिकारी जाधव, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ.माधुरी गुळवे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. व्ही.एस.अस्वले यांनी उपस्थितांचे आभार मानले

Leave A Reply

Your email address will not be published.