Take a fresh look at your lifestyle.

Horoscope Today वृषभ, वृश्चिकसह ‘या’ राशींच्या कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य…

maher

आज दिनांक ९ मे, २०२२. आज होणाऱ्या ग्रहांच्या संयोगामुळे कर्क राशीतील व्यक्तींना अपत्याकडून आनंदप्राप्ती होईल. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात किती आनंद मिळेल हे जाणून घेण्यासाठी पाहुयात आजचे राशीभविष्य…

मेष – मेष राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभफलदायी ठरेल.आज तुम्हाला शासनाकडून गौरवले जाऊ शकते.जर तुम्ही एखाद्या व्यक्ती,संस्था किंवा बँकेकडून कर्ज घेऊ इच्छिता तर ते घेणे टाळा.तुमच्या ग्रहस्थितीनुसार आज घेतलेले कर्ज फेडणे भविष्यात अशक्य ठरू शकते.आज जुन्या मित्रांकडून सहकार्य लाभेल व नवे मित्रही बनतील.जोडीदाराकडून भरपूर सहकार्य लाभेल.

वृषभ – आजचा दिवस वृषभ राशीतील व्यक्तींसाठी थोडा चॅलेंजिंग ठरू शकतो आणि आज काही कामे पार पाडताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.जास्त धावपळ करताना सावधानता बाळगा कारण पायाला जखम होण्याची शक्यता आहे.आज एखाद्या महत्त्वपूर्ण बाबतीत तुम्हाला निर्णय घ्यावा लागू शकतो.ती गोष्ट तुमची मुले किंवा भावंड यांच्याशी संबंधित असू शकते.गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भविष्यात तुम्हाला चांगला फायदा होईल. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

मिथुन – मिथुन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस अधिक खर्चाचा राहील.अनावश्यक खर्च कमी करण्याची गरज आहे.भविष्यात ते पैसे तुमच्याच उपयोगी पडतील.जर तुम्हाला एखादा आजार असेल तर आज तुम्हाला जास्तीचा त्रास सहन करावा लागू शकतो.आज सामाजिक कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ शकतो. संध्याकाळी अचानक लाभप्राप्ती झाल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत रुची वाढेल.अपत्याकडून आनंदाची बातमी मिळाल्याने तुमचे कामात मन रमू लागेल.संगीतात रुची वाढेल.

कर्क – तुमच्या ग्रहस्थितीनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.तुमच्या कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल.आपल्या मुलांचा अभिमान वाटेल असे एखादे काम मुलांकडून होऊ शकते.आज आपल्याच माणसाच्या मदतीसाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागू शकतो.आजोळाकडून प्रेम आणि सहकार्य लाभेल.भौतिक सुखसुविधांठी पैसे खर्च कराल ज्यामुळे तुमच्या शत्रूंना त्रास होईल.

सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरेल.काही कामात तुम्हाला यशप्राप्ती होईल तर काही कामात अशांती आणि तणावाला सामोरे जावे लागेल.आईवडिलांच्या आशीर्वादाने दिवसाच्या उत्तरार्धात थोडा आराम मिळेल.सासरच्या माणसांशी काही कारणास्तव वाद होऊ शकतो.कोणत्याही गोष्टीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व न देणेच फायद्याचे ठरेल. बोलण्यात गोडवा असुद्या. डोळ्यांच्या दुखण्यात आज सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कन्या – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.आज तुमच्यात निर्भीडता पाहायला मिळेल तसेच साहसाने सर्व कठीण कामे पूर्ण करून दाखवाल.आज आईवडिलांकडून एखादया महत्त्वाच्या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन लाभू शकते.पत्नीला काही शारीरिक त्रास उद्धभवल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता आहे.आज तुम्ही इतरांची मदत करण्यात वेळ घालवाल परंतु लोक त्याचा वेगळा अर्थ काढू शकतात.

तूळ – ग्रहस्थितीनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद राहील तसेच तुमच्या अधिकारात आणि संपत्तीत वाढ होईल.आज तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार कराल तसेच मनापासून त्यांची सेवाही कराल.आपल्या गुरूच्या प्रति निष्ठेने काम कराल.एखाद्या नव्या कामात गुंतवणूक करायची असल्यास आज खुशाल करा.

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.काही कारणास्तव मन अशांत आणि चिंतेत राहील.व्यापार विस्तारासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरू शकतात.त्यामुळे तुम्ही निराश व्हाल.संध्याकाळपर्यंत परिस्थितीत सुधारणा होईल.आपले धैर्य आणि प्रतिभा यांच्या जोरावर शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल.लांबणीवर पडलेल्या वादात आज यशप्राप्ती होऊ शकते.

धनू – आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष राहील.विद्या आणि ज्ञानात भर पडेल.दानधर्म,पुण्यकार्य आणि परोपकाराची भावना बळावेल.तुम्ही धार्मिक कार्यात आवडीने मनापासून सहकार्य कराल.परंतु हे करताना सर्व व्यक्तींपासून सुरक्षित अंतर बाळगा.आज नशिबाची उत्तम साथ तुम्हाला लाभेल.आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरेल.आज मौल्यवान वस्तूंच्या प्राप्तीसोबतच आपल्या बजेट बाहेरील अनावश्यक खर्चाचा सामना देखील करावा लागू शकतो.तरीही तुम्हाला तो खर्च करावे लागेल.सासरच्या मंडळींकडून मानसन्मान लाभेल.आपल्या कामात तुमचे मन रमेल तसेच अडलेली कामे पूर्ण झाल्याने लाभही होईल.एखाद्या नवीन कामात गुंतवणूक करण्याची गरज असल्यास बिनधास्तपणे करा.

कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी आंनद घेऊन येईल.आपल्या बुद्धी आणि विवेकाच्या जोरावर आज तुम्ही नवीन शोध लावाल व त्यातून तुम्हाला फायदाही होईल.रोजगाराच्या क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.गरजेपुरताच खर्च करावा.जवळच्याच माणसाकडून धोका मिळण्याची शक्यता आहे. संसारिक सुखोपभोगाच्या साधनात वाढ होईल.संध्याकाळी काही कामासाठी बाहेर जावे लागू शकते.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल.बऱ्याच काळापासून मुलगा किंवा मुलीसंबंधित सुरू असणारे वाद नष्ट होतील.तुमच्या मोकळ्या स्वभावामुळे इतर व्यक्ती तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील.सामाजिक सन्मान प्राप्त झाल्याने तुमचे मनोबल वाढेल व लाभ होईल.

Comments are closed.