Take a fresh look at your lifestyle.

तुमच्याकडे स्मार्टफोन आहे? मग घरबसल्या करा हजारो-लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात आजकाल प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. दररोज किमान चार पैसे आपल्या घरात यावे यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. यासाठी अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सची मदत देखील घेतात. पण त्यातही त्यांना अपयश मिळतं. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता.

सोशल मीडिया अकाउंट्स, तसेच युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय, तुम्ही जर Instagram वापरत असाल तर त्यातूनही घरबसल्या कमाई करता येऊ शकते. आजकाल स्मार्टफोनचा वापर करत असणाऱ्या प्रत्येकाचे Instagram वर अकाउंट असते. Instagram च्या माध्यमातून अनेकांना लोकप्रियता देखील मिळाली आहे. इतकच नाही तर कित्येकांचं हे कमाईचं साधन देखील बनलं आहे.

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्यांना इन्फ्लूएन्सर असं म्हटलं जातं. तुम्ही देखील इंस्टाग्रामला आपल्या कमाईचं साधन बनवू शकता. यासाठी तुमचे कमीत कमी 5 हजार फॉलोअर्स असणे गरजेचं आहे. तुमचे जेवढे जास्त फॉलोअर्स असतील तेवढा जास्त पैसा तुम्हाला कमवता येईल. काही कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सच्या प्रमोशनसाठी तुम्हाला पैसे देतील. अशाप्रकारे तुम्ही कमाई करू शकता.

इंस्टाग्रामवर उघडा Shop

तुम्ही इंस्टाग्रामवर बिझनेस देखील सुरू करू शकता. घरबसल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रोडक्ट्सची विक्री करता येऊ शकते. तुमच्या प्रोडक्ट्सची इंस्टाग्रामवर लिस्ट करून विक्री करणे हा एक चांगला पर्याय आहे. तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर, थेट घरबसल्या तुम्हाला ऑर्डर्स मिळेत. अशाप्रकारे तुम्हाला प्रोडक्ट्सची विक्री करून कमाई करता येईल.

इंस्टाग्रामवर बना कोच

इतकचं नाही तर पैसे कमवण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामवर कन्सल्टेंट अथवा कोच म्हणून सर्विस देऊ शकता. तुम्ही वर्कआउट, योगा अशा वेगवेगळ्या गोष्टींची यूजर्सला माहिती देऊ शकता. तसेच, हॅक्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ शेअर करून ते मॉनिटाइज करता येईल. न्यूट्रिशन टिप्सशी संबंधित कंटेंट देखील तुम्ही शेअर करू शकता. या कोचिंग व टिप्ससाठी तुम्ही इतर यूजर्सकडून पैसे घेऊ शकता. थोडक्यात, तुमचे इंस्टाग्रामवर जेवढे अधिक फॉलोअर्स असतील, तेवढी अधिक कमाई होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.