Take a fresh look at your lifestyle.

LOAN महागड्या होम लोनमुळे त्रस्त आहात? फक्त ही प्रक्रिया करा कमी होईल EMI

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Loan महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो दरांत वाढ केली आहे. रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्याचा परिणाम बँकांच्या व्याजदरावरही दिसून येत आहे. त्यामुळे आता विविध बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटवर (MCLR) आधारित व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांचाही समावेश आहे.

व्याजदरांतील वाढीचा सर्वांत जास्त फटका होम लोन घेतलेल्या ग्राहकांना बसणार आहे. होमलोनचे (Home Loan) व्याजदर वाढल्याने ईएमआयमध्ये (EMI) वाढ होऊन कर्जदारांवर आर्थिक ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येने त्रस्त असलेले कर्जदार बॅलन्स ट्रान्सफरच्या (Balance Transfer) मदतीने काही प्रमाणात पैशांची बचत करू शकतात.

बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे होम लोन बॅलन्स एका बँक किंवा फायनान्स कंपनीकडून (Finance Companies) दुसऱ्या बँकेत किंवा फायनान्स कंपनीकडे ट्रान्सफर करणं. दुसरी बँक किंवा फायनान्स कंपनी होम लोनवर कमी व्याज आकारत असल्याचं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करू शकता. यासाठी तुम्हाला बँकांनी निश्चित केलेली प्रोसेस फॉलो करावी लागेल. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बॅलन्स ट्रान्सफरची वैशिष्ट्यं –

होम लोनचा बॅलन्स ट्रान्सफर केल्याने अनेक फायदे होतात. तुम्ही तुमचा सध्याचा होम लोन बॅलन्स दुसऱ्या बँक किंवा लोन लेंडरकडे ट्रान्सफर करू शकता. ग्राहकाला नवीन बँकेत 1 टक्का बॅलन्स ट्रान्सफर फी भरावी लागते. बहुतेक ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफरची प्रक्रिया ही नवीन होम लोन अॅप्लिकेशनसारखीच असते. होम लोन घेताना बॅलन्स ट्रान्सफरचा कालावधी निश्चित केला जातो. त्यानंतरच ट्रान्सफरची प्रोसेस (Balance Transfer Process) करता येते. जेव्हा दोन बँकांमधील होम लोनच्या व्याजदरात तफावत असते तेव्हा पैसे वाचवण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफरची प्रोसेस केली जाते.

Comments are closed.