Take a fresh look at your lifestyle.

मान्सून अपडेट! महाराष्ट्रातील ‘या’ ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती ओढवली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कित्येक नद्यांना पूर आला असून अनेक गावांतील जनसंपर्क तुटला असल्याची परिस्थिती आहे. अशातच, हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महत्वाचं म्हणजे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बंडाच्या निर्णयाला आधार नाही? शरद पवारांकडून बंडखोरांना आव्हान

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे, पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिण दिशेला आहे. परिणामी, पुढचे पाच दिवस राज्यात सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, अशी माहिती ‘आयएमडी’कडून देण्यात आली आहे.

‘बा विठ्ठला… समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येऊ दे’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

पुढचे दोन दिवस ‘रेड अलर्ट’

महाराष्ट्रात येत्या १३ जुलै या तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ११ जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी ‘या’ लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.