Take a fresh look at your lifestyle.

आज भारतात Hyundai Tucson होणार लाँच; ‘ही’ कार देणार टक्कर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ह्युंदाईने (Hyundai) आज भारतीय बाजारपेठेत आपली प्रीमियम सेगमेंट SUV Tucson लाँच करणार आहे. अद्याप कंपनीने बुकिंग आणि किंमतीशी संबंधित कोणतेही तपशील जारी केलेले नाहीत. पण, या कारचे इंजिन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सशी संबंधित काही माहिती जाणून घेऊया.

इंजिन

ह्युंदाईने (Hyundai) यावेळी टक्सनच्या इंजिनबद्दल (Tucson Engine) जास्त खुलासा केलेला नाही. पण या इंजिनमध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचा पर्याय दिलेला असेल. दोन्ही इंजिन 2.0L असतील. कारमध्ये Hyundai Alcazar चे पेट्रोल इंजिन वापरण्याची अपेक्षा आहे. कंपनी त्याच्या टॉप व्हेरियंटवर ऑल-व्हील ड्राइव्हला सपोर्ट करेल.

सोन्याच्या दरात आज घसरण; किती स्वस्त झालं सोनं?

इंटीरियर

प्रीमियम एसयूव्ही (SUV) असल्याने या कारमध्ये तुम्हाला अनेक प्रीमियम फीचर्स मिळतील. त्याच्या अंतर्गत वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, तुम्हाला दोन 10.3-इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकतात.

या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी या कारमध्ये Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. वैशिष्ट्यांमध्ये दोन डिव्हाइस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम, अ‍ॅम्बियंट लाइटिंगसाठी ६४ लाइट्स, बोस साउंड सिस्टीम, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टीपल एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे.

भारतीय रुपया पुन्हा होरपळला; भांडवली बाजारातील चलन गुंतवणुकीचा थेट परिणाम

एक्सटेरियर

जर तुम्ही या कारची त्याच्या मागील पिढीशी तुलना केली तर तिचा व्हीलबेस 3.4 इंच लांब आहे. या कारचे डिझाइन तत्त्वज्ञान पॅरामेट्रिक डायनॅमिक म्हणून ओळखले जाते. त्याच्या पुढच्या बाजूला ग्रिल जाळी वापरली जाते.

कंपनीने ग्रिल LED DRL शी जोडली असून SUV असल्याने या कारमध्ये 18-इंच अलॉय व्हील वापर केला आहे. त्याच्या रियर लूकमध्ये तुम्हाला त्यात एलईडी टेललाइट्स पाहायला मिळतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.