Take a fresh look at your lifestyle.

मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण…; ईडीची धाड पडताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ईडीची टीम (ED Team) चौकशीसाठी दाखल झाली. ईडीचं पथक दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने रचला इतिहास; गोल्ड मेडल जिंकत नवा विक्रम केला नावावर

संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले की, “ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावेदेखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही, असे म्हणत कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” असंही राऊतांनी नमूद केलंय.

Breaking : ‘या’ शिवसेना नेत्याच्या घरी ईडीचे पथक दाखल; घराबाहेर CISF बंदोबस्त

दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी पथक आज सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झाले. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.