Take a fresh look at your lifestyle.

ICICI बँकेने वाढवले FD व्याजदर, आजपासून नवीन दर लागू

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेत बँक अकाउंट असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या बँकेत एफडी वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ICICI बँकेने मुदत ठेवींवरील अर्थात फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरात 5 ते 10 आधार अंकांची वाढ केली आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपयांवरच्या फिक्स्ड डिपॉजिटवर ही व्याजदर वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. हे व्याजदर 1 वर्षापासून ते दोन वर्षापर्यंतच्या FD वर वाढवण्यात आले आहेत.

अलर्ट! तुमचं सीमकार्डच करू शकतं तुमचं बॅंक खातं रिकामं, जाणून घ्या सविस्तर

आजपासून ICICI बँकेत (icici bank login) सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी FD व्याजदरावर 4.15 टक्के व्याजदर मिळतो आहे. हे व्याज 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर मिळेल. 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीवरील व्याज 4.15 टक्के असेल. याआधी व्याजदर 4.5 टक्के होता.

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक मागील 4.10 टक्क्यांच्या तुलनेत आता 4.20 टक्के व्याजदर देत आहे. या व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! आता ‘या’ दोन पक्षांची युती होणार?

बँकेने व्याजदर 5 बेस पॉइंट्सने वाढवून 4.30 टक्के केला आहे. हे व्याज 18 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर आहे. याआधी हा दर 4.25 टक्के इतका होता.

बँकेने 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. ICICI बँक 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष आणि 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 4.6 टक्के व्याजदर आहे. तसंच 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 3.70 टक्के व्याज दिलं जात आहे.

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँड सर्वात आनंदी देश…तर पहा भारताचे स्थान …!

 

Leave A Reply

Your email address will not be published.