Take a fresh look at your lifestyle.

“गृहमंत्रीपद मिळाल्यास सत्तेत सहभागी होण्याचा विचार करू” – अमित ठाकरे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसेचे युवानेते व राज ठाकरे (Raj Thakare) यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नुकतीच अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येत्या काळातील महापालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation Election) बघता सध्या अमित ठाकरे संवादयात्रा करत आहे, यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील सत्तेत मनसेच्या ‘इंट्री’ बद्दल सूचक विधान केले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, “जर शिंदे -फडणवीस सरकारमध्ये गृहमंत्रीपद (Home Minister) मिळणार असेल, तर मनसे नक्कीच राज्यातील हल्लीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करेल”.

बँक ग्राहकांना आरबीआयचे कवच; ‘या’ पॉवरमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाला बसेल आळा

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, परंतू गृहमंत्री पद आम्हाला मिळण्याबाबत संभाव्यता कमी आहे. यावेळी त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले. सर्व पदाधिकारी याबाबत अहवाल माननीय राजसाहेब ठाकरे यांना देणार असल्याचे यावेळी ते बोलले. एकंदरीतच राज्यातील सत्ता प्रवेशाबाबत मनसेने (Maharashtra Navnirman Sena) अमित ठाकरेमार्फत भूमिका स्पष्ट केल्याचे हे संकेत असून, येत्या काळात मनसेचे शिंदे-फडणवीस सरकारसोबत मनोमिलन झाल्यास राज्यात पुन्हा तिघाडी सरकार स्थापन होईल, हे नक्की.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.