Take a fresh look at your lifestyle.

“जर एकहाती सत्ता मिळाली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करून दाखवेल” – राज ठाकरे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष निर्माण होऊन अनेक वर्षे झाली असली तरी पक्षाला राज्यात विशेष अशी राजकीय कामगिरी करता आली नाही. याचे विशेष कारण म्हणजे नाशिक महापालिका व पहिल्यांदा लढविलेल्या विधासभा निवडणुकीतील ११ आमदारांचा विजय वगळता हल्ली मनसे पक्ष पिछाडीवर पडताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी दरवेळी नवीन भूमिका घेतल्या मग तो मराठी अमराठी मुद्दा असो, मराठी भाषेतील पाट्यांचा मुद्दा असो की उत्तर भारतीयांना हुसकावून लावणे असो प्रत्येक वेळी मनसेला हवे तितके यश गाठता आले नाही.

“राज्य अर्थ विभागाने ‘स्टार्टअप’ उभारणीसाठी सहाय्य करावे”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मनसेचे टोल बंद आंदोलन राज्यात चांगलेच गाजले होते, त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये मनसे दमदार कामगिरी करण्यास सपशेल अयशस्वी ठरला आहे. सध्या राज ठाकरे यांना प्रतीक्षा आहे ती पक्षाकरिता येत्या निवडणुकांमध्ये मोठया विजयाची. नुकतीच अभिनेता सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली असता या भेटीत राज ठाकरे यांनी सूचक असे विधान केले.

‘दैनिक अजिंक्य भारत’चे हेलिकॉप्टरमधून वितरण; मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, प्रसंगी लोटली वाचकांची गर्दी

निमित्त होते ‘हर हर महादेव’ या सुबोध भावे यांच्या आगामी चित्रपटाचे, या चित्रपटातील प्रमुख अभिनेता सुबोध भावे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली असता त्यांना प्रश्न विचारला की, शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एखादी गोष्ट सांगायची असल्यास तुम्ही काय सांगाल? या प्रश्नाला राज ठाकरेंनी देखील तितकेच दमदार उत्तर दिले. प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, ” जर माझ्या हातात सत्ता आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी निर्माण करेल, पक्ष स्थापनेच्या वेळी देखील मी हेच बोललो होतो, त्यामुळे मी हे महाराजांची शपथपूर्वक सांगतो.”

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिरतेतही सावरेल; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन घडणे सहज शक्य आहे, आज ना उद्या किंवा परवा ते नक्की घडेल. पुरुष गरोदर राहणे तसेच बाहेर आलेले टूथपेस्ट परत आत जाणे या दोन गोष्टी सोडल्यास जगात सर्वच शक्य आहे.” असे मिश्किल भाष्य देखील शेवटी बोलताना राज ठाकरे यांनी केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.