Take a fresh look at your lifestyle.

Google Pay आणि Paytm वापरताना या ५ टिप्स लक्षात ठेवाच; अन्यथा होईल…

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सध्या ऑफलाईनपेक्षा ऑनलाइन पेमेंटकडे नागरिकांचा कल वाढतांना दिसत आहे. मोठ्या संख्येने लोक Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या UPI ऍप्सचा वापर करताना दिसतात. हल्ली ऑनलाईन पद्धतीने लोन घेणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. PaySense, CASHe, MoneyTap, PaySense, Dhani, India Lends, या ऍप्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने लोन घेतले जाते.

फक्त ३० हजारात सुपर स्पोर्ट्स बाईक घरी घेऊन जा, मिळेल फास्ट स्पीड आणि जबरदस्त स्टाईल

BankBazaar सारख्या ऑनलाईन साईटवरून आपला CIBIL स्कोअर जाणून घेता येतो. मात्र, सध्या कोणतेही ऑनलाईन पेमेंट करताना आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. ज्यामुळे कोणीही यासंदर्भात कोणताही व्यवहार करताना सावधगिरी बाळगळ्याची जास्त गरज आहे. india lends customer care number

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता पीएम किसान योजनेचे पैसे घरपोच मिळणार; ‘ही’ आहे सरकारची खास योजना

तुम्हाला माहितीय का, की अशावेळी तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. येथे आम्ही तुम्हाला 5 टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही या ऍप्सच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकाल. Paisabazaar

  1. स्क्रीन लॉक : केवळ स्मार्टफोनवरच नाही, तर या ऍप्सवरही लॉक ठेवा. फोन हरवल्यास किंवा चुकीच्या हातात पडल्यास अनेक वेळा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकतं, त्यामुळे अशा वेळी एक्ट्राची सिक्योरीटी म्हणून पासवर्ड ठेवावा, परंतु हे लक्षात ठेवा की, पासवर्ड म्हणून तुमचं नाव, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख वापरू नका.

सोन्याची झळाळी उतरली; उच्चांकी पातळीपेक्षा तब्बल ५४७५ रुपयांनी स्वस्त

2. पिन शेअर करू नका : तुमचा UPI पिन कोणाशीही शेअर करू नका. हा नियम तुमच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींनाही लागू होतो. तुमचा पिन कोणाशीही शेअर करु नका, तुमचा पिन कोणालाही समजला, तर तुम्ही तो लगेचच बदला.

3. या आणि अशा प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नका – लिंकवर क्लिक करू नका: बरेच लोक तुम्हाला व्हॉट्सऍप किंवा ईमेलवर काही लिंक पाठवतात आणि पैशाचे आमिष दाखवून या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. याशिवाय काही फसवणूक करणारे बँक कर्मचारी असल्याचे भासवून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचा तपशीलही विचारतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नका.

जिओ ग्राहकांना मोठा झटका; ‘हा’ प्रीपेड प्लॅन केला दीडशे रुपयांनी महाग

4. ऍप अपडेट करत रहा: सर्व ऍप मेकर कंपन्या वेळोवेळी अपडेट जारी करतात. याद्वारे ऍप्समध्ये नवीन फीचर्स जोडले जातात आणि सुरक्षा वाढवली जाते. त्यामुळे तुम्ही नेहमी UPI पेमेंट ऍप नवीनतम आवृत्तीवर अपडेट केले पाहिजे.

5. एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन वापरणे टाळा: तुम्ही तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त पेमेंट ऍप्लिकेशन असणे टाळावे. PlayStore किंवा App Store वरून नेहमी फक्त विश्वासार्ह आणि सत्यापित पेमेंट ऍप्लिकेशन्स स्थापित करा.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.