Take a fresh look at your lifestyle.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – CIBIL Score अनेकदा काही आर्थिक अडचणीमुळे नागरिक पर्सनल लोन घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मुळात फायनॅन्शिअल प्लॅनिंग (Financial Planning) नसल्यामुळे किंवा अगोदर गुंतवणूक केलेली नसल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाल्यास पर्सनल लोन हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक कुवतीनुसार फायनॅन्शिअल प्लॅनिंग करते. Personal Loan घेण्यासाठी अनेक कारण समोर येऊ शकतात. ज्यात मुलांचं शिक्षण, घर बांधणं किंवा गाडीची खरेदी, एखाद्याच आजारपण, अचानक आलेले आर्थिक संकट अशा बऱ्याचशा गोष्टींचा समावेश होतो.

राज्यसभेतील सहावी जागा कोणाची? मविआत रस्सीखेच; आता लक्ष शरद पवारांच्या भूमिकेकडे

विशेष म्हणजे बऱ्याचदा नोकरदारदेखील पर्सनल लोन (Personal Loan) घेऊन आपल्या मोठ्या गरजा पूर्ण करताना दिसतात. लोन घेताना प्रत्येक व्यक्तीच्या कानावर सिबिल (CIBIL) स्कोअर हा शब्द पडतो. कारण, बहुतेक कर्ज देणाऱ्या संस्था किंवा बँका कर्ज घेणाऱ्याचा सिबिल स्कोअर चेक करतात. कर्जदाचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा, अशी कर्जदात्यांची अपेक्षा असते. पण, जरी तुमचा सिबिल स्कोअर कमी असला तरी तुम्हाला लोन घेता येऊ शकतं. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, याची माहिती या वृत्तात दिली आहे.

मोठा अनर्थ टळला! राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

सुरुवातीला कमी कर्ज घ्या
तुमचा सिबिल स्कोअर तुमची क्रेडिट पात्रता ठरवतो. हा स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता कमी होते; पण, आता अनेक बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था सिबिल स्कोअर कमी असला तरी कमी रकमेचं लोन (Small Amount Loan) देतात. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचं लोन मिळू शकतं. तुम्ही वेळेवर पैसे भरले तर तुमच्या सिबिल स्कोअरमध्येदेखील सुधारणा होईल. त्यानंतर तुम्ही मोठ्या रकमेचं लोन घेऊ शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठीया या लिंकवर क्लिक करा

जॉईंट लोन किंवा गॅरेंटरसह लोन अ‌ॅप्लिकेशन द्या

तुमचा सिबिल स्कोअर कमी असल्यास आणि तुम्ही कर्जदात्याची अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यास, तुम्ही गॅरेंटरसह (Guarantor) म्हणजेच जामीनदारासह अर्ज करून कर्ज घेऊ शकता. अशा स्थितीमध्ये कर्ज देणारी संस्था अर्जदाराचा सिबिल स्कोअर आणि क्रेडिट प्रोफाईल (Credit profile) दोन्ही विचारात घेते. त्यामुळे, चांगल्या क्रेडिट प्रोफाईलसह आणि स्थिर उत्पन्न असलेल्या जमीनदारासह अर्ज केल्यास लोन मंजूर होण्याची शक्यता खूप वाढते. अशाप्रकारे जर तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल आणि तुमचा सिबिल स्कोअर पुरेसा नसेल, तर तुम्ही नातेवाईकांची किंवा मित्रांची गॅरेंटर म्हणून मदत घेऊ शकता.

IPL 2022 बटलर-परागची हुशारी पाहिलीत का? चक्क SIX चे केलेय OUT मध्ये रूपांतर

द्या कर्जाची परतफेड करण्याची खात्री

तुम्हाला पर्सनल लोन देण्यासाठी, कर्ज देणाऱ्या संस्थेला तुमच्या परतफेडीच्या क्षमतेवर विश्वास असणं गरजेचं आहे. पर्सनल लोन हे असुरक्षित लोन असल्यानं कर्ज देणारी संस्था तुमच्या आर्थिक क्षमतांचं मूल्यांकन करण्यासाठी तुमच्या सिबिल स्कोअरवर आणि तुमच्या फायनॅन्शिअल डॉक्युमेंट्सवर अवलंबून असते. खरं तर काही व्यक्तींचा सिबिल स्कोअर कमी असू शकतो; पण त्या व्यक्तीच्या कमाईतून (Earnings) किंवा पगारातून (Salary) कर्जाचे हप्ते फेडले जाऊ शकतील याची खात्री कर्ज देणाऱ्या बँकेला पटली तर तशा व्यक्तीचं प्रकरण बँक कर्ज देण्यासाठी विचारात घेऊ शकते.

अखेर प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता

तुमचा सिबिल स्कोअर कमी असूनही बँक विचार करते हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा तुम्ही आधी कधीच कर्ज घेतलं नसेल आणि नवे कर्जदार म्हणून बँकेत अर्ज दाखल केला असेल. त्यामुळे, तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तुम्ही तुमचं उत्पन्न आणि उत्पन्नाचे कोणतेही अतिरिक्त स्रोत (Income Source) उघड करू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्ही कर्ज देणाऱ्या संस्थेला कर्जाची परतफेड करण्याची खात्री देऊ शकता.

Comments are closed.