Take a fresh look at your lifestyle.

IIFCL ची दमदार कामगिरी; आर्थिक वर्ष 2022 नफा 80 टक्के वाढून 514 कोटींवर

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -iifcl mutual fund IIFCL इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड म्हणजेच IIFCL ने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 80 टक्क्यांनी वाढून 514 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर्जात वाढ आणि बुडीत कर्जात घट झाल्यांनी कंपनीचा नफा वाढला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 285 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पत्नीच्या नावे उघडा अकाउंट; छोट्याशा गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन

IIFCL ने मागील वर्षी नोंदवलेल्या कामगिरीचा ट्रेन्ड कायम ठेवत, 2021-22 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 25,120 कोटी आणि 10,445 कोटी इतक्या स्वतंत्र मंजूरी (standalone Sanctions) आणि वितरणासह (Disbursements) विक्रमी कामगिरी केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत एकत्रित मंजूरी आणि वितरणे 1,84,207 कोटी आणि 91,822 कोटी होती.

IIFCL ची नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPAs) एका वर्षापूर्वी 13.9 टक्क्यांवरून 9.22 टक्क्यांवर घसरले आहे. कंपनीचा नेट एनपीए देखील मागील वर्षीच्या 5.39 टक्क्यांवरून 3.65 टक्क्यांवर घसरला आहे.

गॅस सिलिंडरवरील अनुदान आता फक्त ‘याच’ लोकांना मिळणार

कंपनीची सलग दोन वर्षे विक्रमी कामगिरी क्षमता दर्शवते की, IIFCL भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये जसे गतीशक्ती, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन, भारतमाला योजना, सागरमाला योजना यासारख्या प्रमुख कार्यक्रमांद्वारे योगदान देऊ शकते.

महागड्या होम लोनमुळे त्रस्त आहात? फक्त ही प्रक्रिया करा कमी होईल EMI

कंपनीबद्दलची माहिती

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) ची स्थापना 2006 मध्ये भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या दीर्घकालीन वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या संपूर्ण मालकीची संस्था म्हणून करण्यात आली. स्थापनेपासून, IIFCL भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्राचा प्रचार, विकास आणि वित्तपुरवठा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. IIFCL ही एकमेव सरकारी मालकीची वित्तीय संस्था आहे जी तिच्या विविध उत्पादनांद्वारे सर्व पायाभूत सुविधा उप-क्षेत्रांची पूर्तता करते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.