Take a fresh look at your lifestyle.

फेसबुक वापरकर्त्यांसाठी पुढे आली महत्वाची माहिती ; १ डिसेंबरपासून ‘हे’ नवीन बदल लागू होणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरातील लोकांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमाने जोडणारे सुप्रसिद्ध समाजमाध्यम फेसबुक हल्ली एका नवीन बाबीमुळे चर्चेत आले आहे. फेसबुकने आपल्या काही वर्षांच्या प्रवासात जगभरातून असंख्य वापरकर्त्यांना आपल्यासोबत जोडले असून सध्या इंस्टाग्राम आणि व्हॉटसअप देखील फेसबुकच्या पालकत्व असणाऱ्या मेटा कंपनीच्या मालकीचे आहे. नुकतेच मेटाच्या प्रवक्त्यांकडून फेसबुक मध्ये आगामी काळात होणाऱ्या चार प्रमुख बदलांबाबत भाष्य केले असून, येत्या १ डिसेंबर पासून हे सर्व बदल लागू करण्यात येणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हे सर्व बदल वापरकर्त्यांच्या प्रोफाइल सेटिंग बाबत केले जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सुगीचे दिन येणार; महागाई भत्त्यात ३४ टक्क्यांपर्यंत वाढ

पुढे आलेल्या माहितीनुसार, येत्या १ डिसेंबरपासून फेसबुकद्वारे वापरकर्त्यांच्या प्रोफाईलवरून त्यांचा पत्ता, धार्मिक विचार, राजकीय विचार आणि लैंगिक प्राधान्याचा पर्याय हटविण्यात येणार आहे. ज्या वापरकर्त्यांनी आजवर हे सर्व पर्याय भरले आहे, त्या सर्वांना फेसबुककडून सूचना पाठविण्यात येणार आहे, अन्यथा हे सर्व तपशील स्वतः फेसबुक कडून काढून टाकण्यात येणार आहे. मेटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, येत्या काळात फेसबुकला वापरणे सोपे व्हावे तसेच क्लिष्टता कमी करण्याचा भाग म्हणून हे सर्व बदल करण्यात येण्याचा खुलासा त्यांनी केला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय; घरगुती एलपीजी सिलेंडरला ‘क्यूआर’ कोड लागणार

एकंदरीतच १ डिसेंबर पूर्वी ज्या वापरकर्त्यांनी फेसबुक प्रोफाइल वर दिलेल्या माहितीप्रमाणे तपशील भरले असतील तर ते काढून टाकणे आवश्यक राहणार आहे, संबंधित बाबीकरिता सूचना देखील मिळणार असून वापरकर्त्यांनी स्वतःहून याकरिता पुढाकार घेतल्यास ते आणखी इष्ट ठरणार आहे. नववर्षापूर्वीच फेसबुक हे सर्व बदल करणार असल्याने आगामी काळात वापरकर्त्यांना कुठल्याही अन्य वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीतून हे सर्व बदल १ डिसेंबर नंतर बाद झालेले दिसणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.