Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : १ ऑक्टोबर पासून क्रिकेटमध्ये ‘हे’ नवे नियम लागू होणार; ‘आयसीसी’चा निर्णय

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेटच्या तिन्ही महत्वपूर्ण फॉरमॅट बद्दल काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्व नवे नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आहे. याअगोदर कोरोना संसर्गाचा धोका बघता चेंडूला थुंकी लावण्यावर आयसीसीने कठोर निर्बंध घातले होते. नंतर सौरव गांगुली यांनी बीसीसीआय तर्फे काही प्रमुख शिफारसी आयसीसी कडे सादर केल्या होत्या त्यामुळे नवीन बदल करण्यात येणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये चेंडूवर थुंकी लावण्यास कायमची बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ‘मराठा आरक्षणा’चा तिढा कायम; शिंदे-फडणवीस सरकारनं उचललं मोठं पाऊल

१ ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नव्या नियमांपैकी काही नियम असे आहे की, २०-२० खेळामध्ये ज्याप्रमाणे एक खेळाडू बाद झाल्यास पुढील येणाऱ्या खेळाडूला ९० सेकंदात तयार रहावे लागते अन्यथा त्याला बाद म्हणून घोषित करण्यात येते आता हा नियम एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये देखील लागू होणार आहे. एकदिवसीय व कसोटी खेळात खेळाडूला २ मिनिटे इतका वेळ दिला जाणार आहे, जर बाद खेळाडूनंतर नवीन खेळाडू २ मिनिटे इतक्या वेळात हजर न झाल्यास त्याला बाद म्हणून घोषित करण्यात येईल. दुसरा नियम असा असेल ज्यानुसार जर एखादा खेळाडू धावबाद झाला तर खेळायला येणाऱ्या नव्या खेळाडूला स्ट्राईकवर फलंदाजी करावी लागेल. इथे जरी क्रीज बदलली गेली असेल तरी हा नियम लागू असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या दिल्लीवारी; दौऱ्यामागील नेमकी कारणे गुलदस्त्यात

तिसऱ्या होणाऱ्या बदलानुसार एखाद्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने जर चेंडू गोलंदाज चेंडू फेकत असताना चुकीची हालचाल केली तर फलंदाजाला ५ धावा देण्यात येतील. चौथ्या नव्या नियमानुसार जर चेंडू खेळपट्टीपासून दूर फेकल्या गेला तर फलंदाजाला क्रीज वरच थांबावे लागेल व तो डेड बॉल घोषित होईल जर फलंदाजापासून चेंडू दूर फेकण्यात आला व फलंदाजाने तो चेंडू खेळण्यास हा नो बॉल देण्यात येणार आहे. पाचव्या नव्या नियमानुसार जर एकदिवसीय खेळात गोलंदाजी करताना स्लो ओव्हर केल्यास आता दंड आकारण्यात येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.