Take a fresh look at your lifestyle.

“बारामतीत सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण…”; जयंत पाटलांचं भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एखाद्याचा अश्वमेध अडवल्यानं होणारा त्रास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमुळे भाजपला होतो, याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे. जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“बारामतीची जनता कशी आहे हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे बारामतीत कोणीही आले तरी खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एक लाखाहून अधिक मतं मिळतात. बारामतीत सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामती शरद पवारांना सोडणार नाही, इतकं त्यांचं घट्ट नातं आहे.” असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर; २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार

“बारामतीत कोणता उमेदवार उभा करायचा हे भाजप ठरवेल. भाजपने सध्या बारामतीला आणि आम्हाला टार्गेट केले आहे. त्यामुळे आम्ही सर्वात मोठ्या लोकांवर निशाणा साधला आहे, असे वातावरण निर्माण करणे ही भाजपची स्टाईल आहे. मात्र, काही दिवसांनी आम्हीसुद्धा योजना मांडू. त्यावेळी कोणाला लक्ष्य केले जात आहे, हे तुमच्याही लक्षात येईल.” असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

सत्ता असेल तर त्यांनी सत्तेत असताना जनतेची कामे करणे बंद करून अशी तयारी सुरू केली आहे. म्हणजे आपली लोकप्रियता कमी होऊ लागली आहे, हे भाजपला कळू लागले आहे. लोकप्रियता कमी झाली की भाजप अशा गोष्टी करतो, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले होते. ते का नाकारले याची चर्चा करु इच्छित नाही. पण शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणे बावनकुळे यांना शोभत नाही,” असा टोमणाही पाटलांनी मारला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.