Take a fresh look at your lifestyle.

भविष्यात ‘शिवसेना’ ही एकनाथ शिंदे यांची होणार – आशिष शेलार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीची सरकार कोसळ्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे गटातील नेत्यांवर सातत्याने जोरदार टीका होत आहे. दरम्यान, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नेहमी टीकाटिप्पणी करत असतात. मुंबई महापालिकेच्या निवडणूका काही दिवसांनी होणार असल्याने शेलारांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर वरळी दौऱ्यावर असताना टीकास्त्र डागले आहे.

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शिंदे-फडणवीस सरकारकडे केली ‘ही’ मागणी

आदित्य ठाकरे सध्या वरळी विधानसभेच्या निमित्ताने या मतदारसंघात फिरत आहेत. यामुळे त्यांना मराठी माणसाच्या भावना कशा समजणार. भाजप आणि मराठी जनता यांची वेगळी नाळ जुळली आहे. त्यामुळे आम्ही दिवाळी पार्श्वभूमीवर 233 ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. ‘मुंबईकरांसाठी भाजप आणि मुंबईकरांच्या आनंदात भाजप’ हे चित्र निर्माण झालंय जे दुसऱ्यावर जळत राहतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आंनद कसे देतील, असा टोला शेलारांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

ठाकरे-शिंदे गट समोरासमोर; ठाण्यानंतर नवी मुंबईत शाखा ताब्यात घेण्यावरून वाद

मूळ शिवसैनिक हा एकनाथ शिंदेंबरोबर

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीबाबत विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी हा मराठी माणसाने केलेला उठाव आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जवळच्या व्यक्तीने ही मागणी केली आहे. राज्यातील मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. यामुळे भविष्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असेल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

धक्कादायक! पावसाच्या दृष्टचक्राने केला पुन्हा घात; ‘या’ जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

मुंबईकरांशी भाजपची नाळ

भाजपची मुंबईकरांशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाला स्थान देत दिवाळीत मोठे कार्यक्रम घेतले. याउलट ठाकरे गटाची फौज पेग, पेंग्विन आणि त्यांचे आमदार पबमध्ये गुंतलेले आहेत. मुंबईतील मराठी माणसाला उभे करण्याचे काम भाजप करत असल्याचे ते म्हणाले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.