Take a fresh look at your lifestyle.

आपले सरकार आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

0
maher

सुनील रासने, ओटीटी न्यूज नेटवर्क

राहुरी : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या यांच्या जनसंपर्क कार्यालयाअंतर्गत आपले सरकार आपल्या दारी या योजनेनुसार राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गुहा येथे हनुमान मंदीरात, बारागाव नांदूर येथील संत तुकाराम विद्यालय व जोगेश्वरी आखाडा येथील नूतन मराठी शाळा नंबर 2 येथे आधार कार्ड नवीन काढणे तसेच दुरुस्ती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय येथे 40 विद्यार्थ्यांची आधार कार्ड दुरुस्ती करण्यात आली. यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच त्यांनी पुन्हा शिबिर घेऊन सर्व ठिकाणी आयोजन करण्याचे निर्देश दिले. गुहा येथे हनुमान मंदीरात आयोजित केलेल्या शिबिरात 38 आधार कार्ड नवीन व दुरुस्ती करण्यात आले. तसेच ई श्रम कार्ड, रेशन कार्ड तयार करण्यात आले. यावेळी सुजित वाबळे, अशोक उ-हे, शौकत सय्यद, रामा बर्डे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. सर्व नागरिकांची आधार दुरुस्ती व नवीन पूर्ण न होऊ शकल्यामुळे पुन्हा शिबिराची मागणी करण्यात आली. जोगेश्वरी आखाडा येथे 46 आधार कार्ड नवीन व दुरुस्त करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडीव इतर मान्यवरांनी येथे भेट देऊन आढावा घेतला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले

बारागाव नांदूर येथे संत तुकाराम विद्यालयात 46 नवीन आधार कार्ड व दुरुस्ती करण्यात आले. यावेळी प्रभाकर गाडे, नवाज देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी लक्ष दिले. वरील सर्व ठिकाणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय कदम यांनी भेट देऊन आढावा घेतला. सर्व ठिकाणी पुन्हा आधार कार्ड शिबिर तसेच सर्व गावात ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात यावे यासाठीची मागणी करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.