Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिकांची नव्याने प्रभाग रचना होणार; नगरविकास विभागाचे आदेश

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपैकी बहुप्रतीक्षित महापालिकेच्या निवडणुका अद्यापपर्यंत रखडल्या असल्याने, याबाबतीत नेमक्या तारखांची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निश्चित होणार आहे. पुढील आठवड्यात याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालय काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणाला राजकीय नाट्यमय वळण आले असून, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून नुकताच राज्यातील २४ महापालिकांच्या नव्याने प्रभाग रचनेचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावणार आहे, कारण या आदेशानंतर महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘जी-२०’ परिषदेचे सकारात्मक परिणाम; ऑस्ट्रेलियन संसदेची भारतासोबत मुक्त व्यापाराला हिरवी झेंडी

यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना महापालिकेच्या प्रभागांच्या रचनेत बदल केला गेला होता. मात्र यावेळी शिंदे -फडणवीस सरकारने ज्या महापालिकांची मुदत संपली आहे त्यांची जनगणनेनुसार नव्याने प्रारूप तयार करत प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या गेल्या आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काळात महापालिकांच्या प्रभाग रचनेत काही फेरबदल होणार हे निश्चित आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 10 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ; जागतिक मंदीचे सावट गडद

सध्याची राज्यातील महापालिकांनी स्थिती बघता अनेक महापालिकांच्या मुदती संपल्या असून येथील प्रशासकीय सेवक महापालिकांचा कार्यभार सांभाळत आहे. राज्यातील प्रमुख महापालिकांपैकी औरंगाबाद, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका मागील दोन वर्षांपासून रखडल्या आहे, तसेच मुंबई महापालिकेला यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापासून निवडणुकीची प्रतीक्षा आहे. नगरविकास विभागाने नुकताच दिलेला आदेश तसेच पुढील आठवड्यातील सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी यामुळे निवडणुकांच्या तारखा घोषित होण्यावर अनिश्चिततेचे सावट गडद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.