Take a fresh look at your lifestyle.

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय मोदींमुळे की योगींमुळे?; मंत्री गडकरी म्हणतात…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण निर्माण करूनही एवढा मोठा विजय कोणामुळे झाला, हाच प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हाच प्रश्न विचारला असता, त्यांनी याचं सविस्तर उत्तर दिले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सरकारने केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला
केंद्रीय मंत्री म्हणाले की, “जात, धर्म, समुदायाच्या वर उठून लोकांचा कायद्यावर विश्वास आहे. सरकारने केलेल्या कामावर जनतेने विश्वास दाखवला. गंगा शुद्धीकरण, जलमार्ग, राष्ट्रीय मार्ग आदी कामे करून लोकांना दिलासा मिळाला, तर त्याचा फायदा सरकारला निवडणुकीत झाला. लोकशाहीत कायद्याचा आदर आणि भीती नसेल, तर ती चांगली गोष्ट नाही. योगीजींनी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे माता-भगिनींमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा  जगात संकटांची मालिका… आधी कोरोना, त्यानंतर युद्ध आणि आता येणार…

कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित झाले

एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री गडकरींना विचारण्यात आले की उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय कोणाचा आहे? हा योगीजींच्या लोकप्रियतेचा विजय आहे की मोदीजींच्या मार्गदर्शनाचा विजय आहे? यावर केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारचे काम आणि युपीमध्ये योगी सरकारने केलेल्या कामाचा परिणाम म्हणजे भाजपाला एवढा मोठा विजय मिळाला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, योगीजींनी धाडस दाखवून गुंडांवर कारवाई केली. उत्तर भारतात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक समस्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित झाले.

हेही वाचा  कांदा उत्पादक शेतकरी संकटात! विक्रमी लागवड होऊनही उत्पन्नात होणार मोठी घट

Leave A Reply

Your email address will not be published.