Take a fresh look at your lifestyle.

Income Tax : मोठी बातमी! उद्यापासून बदलत आहेत इनकम टॅक्‍सचे नियम, व्यवहार करण्यापूर्वी ‘या’ बाबी जाणून घ्या

maher

मुंबई – Income Tax – Pan-aadhar Mandatory – तुम्हीही या पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे व्यवहार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. उद्यापासून आयकर विभाग मोठा नियम बदलत आहे. आता नवीन नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा केल्यास, त्याला पॅन आणि आधार कार्ड जमा करणे अनिवार्यपणे असणार आहे.

मोठी बातमी! ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; वाचा सविस्तर

Income Tax प्राप्तिकर (15 वी सुधारणा) नियम, Income Tax 2022 अंतर्गत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन नियम जारी केले आहेत, जे उद्यापासून म्हणजेच 26 मे पासून लागू होणार आहेत.

जर एखाद्याने एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 20 लाख रुपये रोख जमा केले तर त्याला पॅन-आधार सबमिट करावा लागेल.

रेशनच्या नियमांमध्ये झालेले मोठे बदल जाणून घ्या; जूनपासून लागू होणार बदल

  • एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील कोणत्याही एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये काढण्यासाठी देखील पॅन-आधार लिंक करणे आवश्यक असेल.
  • तुम्ही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडले तरीही पॅन-आधार द्यावा लागेल.
  • जर एखाद्याने चालू खाते उघडले तर त्यासाठीही पॅन कार्ड अनिवार्य असेल.
  • जर एखाद्याचे बँक खाते आधीच पॅनशी जोडलेले असेल, तर तरीही त्याला व्यवहारांसाठी पॅन-आधार लिंक करावे लागेल.

येत्या तीन दिवसांत पाऊसच पाऊस! जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

रोखीच्या व्यवहारांवर सरकारची नजर

रोख रकमेची चोरी कमी करण्यासाठी आणि देखरेखीच्या उद्देशाने आयकर विभागाने (Income Tax)हा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाला लोकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती राहावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. आता आधार आणि पॅन जोडल्यामुळे अधिकाधिक लोक आयकराच्या कक्षेत येतील. व्यवहारादरम्यान पॅन क्रमांक असल्यास, आयकर विभाग तुमच्यावर बारीक नजर ठेवेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.