Take a fresh look at your lifestyle.

विधानभवन परिसरात सत्ताधारी-विरोधक संघर्ष पेटला; सत्ताधारीदेखील झाले आक्रमक

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्ता गेल्याचे दुःख विरोधकांना पचविणे चांगलेच जड झाले असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत असून, वारंवार विधानभवन परिसरात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना डिवचविण्याचा प्रकार घडत आहे. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सत्ता हातून निसटल्याचा आक्रोश व्यक्त केला. आतापर्यंत सावध भूमिका घेत वागणारे सत्ताधारी पक्षातील नेते देखील आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेविरोधांत विधानभवनात जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांदरम्यान धक्काबुक्की झाल्याची स्थिती निर्माण झाली होती.

“तर मी राजीनामा देईल! “दीपक केसरकरांची सिंहगर्जना; विरोधकांना दिले प्रत्युत्तर

आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून हा चांगलाच वादळी ठरला, यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी विरोधकांना इशारा दिला की जर कुणी आम्हाला धक्काबुक्की करत असेल तर त्यांना तसेच उत्तर देण्यात येईल. यावेळी बोलताना गोगावले म्हणाले की, आम्ही त्यांचे सर्व घोटाळे बाहेर काढत असल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू परंतु जर कुणी धक्काबुक्की करत असेल तर आम्ही त्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ अशा तीव्र शब्दात सत्ताधारी नेत्याकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून मिळणार अनुदान; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

येत्या काळात सत्ता गेल्याचा आकस विरोधक कशा प्रकारे काढतात हे नक्कीच बघायला मिळेल परंतु आता पर्यंत सावध व शांत भूमिका घेणारे सत्ताधारी आक्रमक झाल्याने विरोधकांना जड जाणार, हे नक्की!

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.