Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, कसा असेल यंदाचा पाऊस? हवामान विभागानं वर्तवला अंदाज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रासह (Maharastra) देशातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (heavy rainfall) धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं (farmer) मोठं नुकसान झालं आहे. मार्च महिना (March 2022) निम्मा संपत आला तरीही अवकाळीचं संकट कायम आहे. मात्र अशातच यावर्षीच्या मान्सून (monsoon update) बाबत शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

यंदा पाऊस कसा राहिल याबाबत हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं (Australian meteorological department) हा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार यंदा भारतात जून, (June) जुलै, (July) ऑगस्ट (August) आणि सप्टेंबर (september) या चारही महिन्यात चांगला पाऊस (Rain) होणार आहे.

हेही वाचा –  सावधान! दोन दिवस तुमच्या घरातील बत्ती होणार गुल, जाणून घ्या कारण…

ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे. दरवर्षी ते आपला अंदाज वर्तवत असतात. त्यांचा अंदाज स्कायमेट (skymet weather news) सारखाच असतो. मात्र, यंदा त्यांनी अंदाज वर्तवला असला तरी, भारतीय हवामान विभागाकडून अद्याप कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. पण पुढील महिन्याच्या सुरुवातीला त्यांचेही अंदाज येऊ शकतात.

हेही वाचा –  मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा; थेट मुंबई पोलिसांची कॉलर पकडली, व्हिडिओ व्हायरल

अगदी दोन दिवसापूर्वी स्कायमेटने (skymet Weather) सुद्धा भारतात यंदा समाधानकारक पाऊस राहिलं असा आपला प्राथामिक अंदाज वर्तवला होता. मान्सूनचा प्रवास कसा असेल आणि कधी सुरू होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच येईल असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेन देखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवता होता. मात्र त्यांनीही याबाबत सविस्तर माहिती दिली नव्हती.

हेही वाचा – ‘या’ बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये कमाईच्या संधी, शेअरमध्ये तब्बल 35 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता

कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातील वेगवेगळे हवामान विभाग यंदा मान्सून कसा असेल याबाबत सविस्तर माहिती देतील. दरम्यान, यावर्षीही देशासह राज्यासाठी पावसाळा सुखावणारा होता. देशातील बहुतांश भागांत पावसानं जोरदार हजेरी लावली होती. अशातच ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाज जर खरा ठरला तर, यंदाच्या वर्षीही वरुणराजाची कृपादृष्टी असल्याने शेतकरी सुखावला जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.