Take a fresh look at your lifestyle.

IND Vs SA 2nd T20: क्रिकेट मॅचचे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं? Cricket

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

दिल्ली – नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पार पडला. दिल्लीत पार पडलेल्या या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ७ गडी राखून धुव्वा उडवला आहे. आता दुसरा टी-२० सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेन.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर; या कारणासाठी मुदतवाढ

दुसरा सामना कटक येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्री सुरू असताना मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तिकीट घेण्यासाठी उभ्या असणाऱ्या रांगेत काही महिला रांगेच्या पुढे आल्या, त्यामुळे जमावाने गोंधळ घालायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला.

मान्सून पूर्व पावसाने निम्मा महाराष्ट्र पाण्यात; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट!

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या रांगेत काही महिला रांगेच्या पुढे आल्या, यावेळी तिकीट घेण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी आरडाओरड करत गोंधळ घालायला सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.”

Hero MotoCorp ने लॉंच केली नवी स्प्लेंडर , फक्त इतक्या किंमतीत खरेदी करा

१२ हजार तिकिटं आणि ४० हजार लोकांची गर्दी
अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त प्रमोद रथ यांनी सांगितलं की, “१२ हजार तिकीटांची विक्री सुरू असताना काउंटरवर सुमारे ४० हजार लोकांची गर्दी होती. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, म्हणून पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.”

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताने आफ्रिकेला २१२ धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं ५ चेंडू बाकी असताना सहज विजय मिळवला. भारताला पहिल्यांदाच टी-२० सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने आयपीएलचा उत्कृष्ट फॉर्म कायम राखत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.