Take a fresh look at your lifestyle.

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिरतेतही सावरेल; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला विश्वास

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सध्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्था हळूहळू मंदीच्या दिशेने वाटचाल करत असून आगामी वर्षात जगातील प्रमुख देश मंदीचा सामना करणार आहे . जेव्हा देशातील अर्थव्यवस्थेवर मंदीची कुऱ्हाड कोसळते तेव्हा वस्तूंचे दर तर वाढतातच सोबतच त्यांचा प्रचंड तुटवडा देखील जाणवतो. देशांतर्गत बेरोजगारीची समस्या देखील वाढते कारण व्यापारांना आर्थिक फटका बसल्याने मनुष्यबळात घट करण्यात येते. अशा भयावह परिस्थितीचा सामना आगामी काळात जगाला करावा लागण्याचे संकेत यापूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने दिले होते. एकंदरीतच अशा अस्थिरतेच्या काळात देखील भारतीय अर्थव्यवस्था सावरेल व मंदीच्या संकटातून देश आर्थिक बाबतीत स्थिर असेल, असे महत्वपूर्ण विधान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केले.

“निकोप समाजासाठी सक्षम न्यायव्यवस्थेची गरज”-पंतप्रधान नरेंद्र मोदी

निर्मला सीतारामन यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय चलन आणि वित्तीय समितीच्या बैठकीस हजेरी लावली होती, त्यावेळी जगातील प्रमुख देशांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल मोठे विधान केले. यावेळी पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या की, अन्न व ऊर्जा उत्पादनांच्या वाढत्या किमती, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांची मंदावलेली वाढ, भू-राजकीय स्वामित्व वर्चस्ववादामुळे व यातून निर्माण वैमनस्यामुळे व्यापारावर झालेले प्रतिकूल परिणाम या सर्वांचा अत्यंत वाईट परिणाम अस्थिर अर्थव्यवस्थांवर होत आहे, याबाबत प्रयत्न करण्यासाठी चर्चा म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारत सरकारने महागाई नियंत्रण व आर्थिक विकास यांचे नियोजन केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

‘या’ बँकेच्या ग्राहकांकरिता आनंदाची बातमी; सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ

भारत सरकारच्या कार्याचा लेखाजोगा सांगतांना सीतारामन म्हणाल्या की, भारत सरकारने गेल्या २५ महिन्यात ८० कोटींपेक्षा अधिक दुर्बल घटकातील लोकांना मोफत अन्नधान्य दिले आहे. देशात डिजिटल प्रणालीचा वेगाने स्वीकार होत असताना येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सुस्थिर राहील असा आशावाद त्यांनी आंतरराष्ट्रीय बैठकीत व्यक्त केला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.